बॉलीवूडमध्ये जशा कलाकारांच्या काही जोड्या प्रसिद्ध आहेत, तशाच दिग्दर्शक कलाकार, लेखक-लेखक यांच्या जोड्यादेखील प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, सलीम खान आणि जावेद अख्तर यांची जोडी आहे.

आता प्रसिद्ध लेखक जोडी जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्यावर आधारित ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंटरी सीरीज रिलीज होणार आहे. आता याच्या प्रिमिअर सोहळ्याला जावेद अख्तर यांनी सलीम खान यांची मुले म्हणजेच सलमान खान, अरबाज खान लहानपणी कसे होते, याबद्दल वक्तव्य केले आहे.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Marathi Actor Shubhankar Ekbote Meets Aamir Khan
“जन्म १९९४, पहिला चित्रपट पाहिला…”, मराठी अभिनेत्याचं नाटक पाहायला आला आमिर खान! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
Aamir Khan
“सलग आठ चित्रपट फ्लॉप…”, आमिर खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले, “करिअर संपले…”
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

सलमान खानबद्दल काय म्हणाले जावेद अख्तर?

जावेद अख्तर म्हणतात की, १९६५ साली जेव्हा पहिल्यांदा मी सलीम साहेबांच्या घरी गेलो होतो. तेव्हा सलमान एक वर्षाचादेखील नव्हता. तो आता खूप हँडसम दिसतो, पण हे आताच घडले नाही. तर तो लहानपणापासूनच खूप सुंदर दिसतो. सलीम साहेबांच्या लिव्हिंग रुममध्ये सलमानचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो असायचा. ती एक छोटीशी फ्रेम होती. आजही ती असेल, मला माहित नाही.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, सलमान आज धाडसी हिरो आहे पण, लहान असताना तो खूप लाजाळू होता. कमी बोलायचा. शांतपणे कोपऱ्यात बसून राहायचा.

अरबाज खानबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणतात, अरबाज हा खूप आगाऊ मुलगा होता. त्याचे केस कधीच विस्कटलेले नसायचे. जेव्हा तो ६ वर्षाच्या मुलाला तुम्ही कधी कंगव्याने विंचरताना पाहिले आहे का? अरबाज इतक्या लहानपणी कंगवा घेऊन फिरायचा. त्याचे स्व:तावर खूप प्रेम होते. असे हसत जावेद अख्तर यांनी सांगितले.

हेही वाचा: आई-वडिलांपासून लपून ‘हे’ काम करायची रिंकू राजगुरू; स्वत:च खुलासा करत म्हणाली, “रात्री…”

दरम्यान, ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंटरी वेब सीरीज अमेझॉन प्राइम व्हीडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन नम्रता राव यांनी केले आहे. या डॉक्युमेंटरीच्या प्रिमिअम सोहळ्यानिमित्त जावेद अख्तर आणि सलीम खान हे गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आता या डॉक्युमेंटरीमध्ये काय पाहायला मिळणार हे उत्सुकतेचे ठरत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तो ‘टायगर व्हर्सेस पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader