ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अलीकडेच पाकिस्तानमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून चांगलंच सुनावलं होतं. त्यांच्याच देशात जाऊन त्यांना सुनावल्याने भारतीय जावेद अख्तर यांचं कौतुक करत आहेत. तर, पाकिस्तानमधील सेलिब्रिटी मात्र त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. पाकिस्तानी कलाकारांकडून होणाऱ्या या टीकेला जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पाकिस्तानला घरात घुसून मारलं” कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर म्हणाले, “मी तिला फार…”

पाकिस्तानी अभिनेता-निर्माता एजाज अस्लमने ट्वीटमध्ये लिहिलं की, “जावेद अख्तर यांच्या मनात इतका द्वेष असेल तर त्यांनी येथे यायला नको होतं. तरीही आम्ही तुम्हाला इथून सुखरूप जाऊ दिलं. तुमच्या मूर्खपणाला हेच आमचे उत्तर आहे.”

याशिवाय अनेक पाकिस्तानी युजर्सनीही त्यांच्यावर टीका केली होती. तुम्हाला जर पाकिस्तान दहशतवाद्यांचा देश वाटतोय, तर तुम्ही इथे का आलात, तुम्हाला कोणी आमंत्रित केलं होतं? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया युजर्स देत होते. या सर्वांवर जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे.

फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावल्यानंतर तिथं उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या. नंतर मात्र सोशल मीडियावर टीका होऊ लागली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. “त्या सर्व लोकांनी त्या दिवशी तिथे टाळ्या वाजवल्या होत्या. ते माझ्याशी सहमत होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना भारत आवडतो, त्यांना आमच्याशी चांगलं नातं हवं आहे. भारताशी जोडू इच्छिणाऱ्या लाखो लोकांशी आपण कसे जोडले जाऊ?,” असं जावेद अख्तर म्हणाले.

“तिला १००० पुरुषांबरोबर…” अयोध्येच्या महंतांची स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या लग्नावर टीका

यावेळी जेव्हा जावेद अख्तर यांना दोन्ही देशांनी चर्चा करण्याची हीच वेळ आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. ते उत्तर देत म्हणाले, “याबद्दल बोलण्याची माझी क्षमता नाही. जे सत्तेत आहेत, ज्यांच्याकडे पद आहे, त्यांना काय चाललं आहे, ते कळतं. काय परिस्थिती आहे, ती कशी सांभाळायची, या सर्व गोष्टी त्यांना कळतात. पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी जनता, पाकिस्तानी संस्था या सर्वाचं एकमत नाही,” असं जावेद अख्तर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar reply to pakistani actors who troll him for his statement at lahore function hrc
Show comments