रणबीर कपूर व रश्मिका मंदाना अभिनीत ‘अॅनिमल’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन साडे तीन महिने झाले आहेत. पण हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. या चित्रपटातील संवाद, गाणी सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. मात्र दुसऱ्याबाजूला या चित्रपटावरून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा व प्रसिद्ध कवी, लेखक जावेद अख्तर यांच्यातील कोल्ड वार अजूनही सुरुच आहे. नुकतंच जावेद अख्तर वांगा यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर भडकले आणि त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पण नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या…
‘अॅनिमल’ या चित्रपटाविषयी जावेद अख्तर यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, “एका चित्रपटातला एक पुरुष महिलेला म्हणतो की माझे बूट चाट, जर महिलेला थोबाडीत ठेवून दिली तर काय बिघडलं, असे संवाद असणारा चित्रपट सुपरहिट होणं ही अत्यंत घातक बाब आहे.” जावेद अख्तरच्या याचं वक्तव्यावर संदीप रेड्डी वांगा यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
हेही वाचा – Video: ‘साधी माणसं’नंतर ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची घोषणा, पूजा बिरारी-विशाल निकमसह ‘हे’ कलाकार झळकणार
संदीप रेड्डी वांगा म्हणाले होते की, त्यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्ट झालं की त्यांनी चित्रपट पूर्णपणे पाहिलेला नाही. एखादी व्यक्ती चित्रपट न बघताच त्यावर भाष्य करत असेल तर त्याला मी तरी काय करणार? आजवर जेवढ्या लोकांनी या चित्रपटावर टीका केली आहे, त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय ते पाहायचे कष्ट का घेतले नाहीत? हीच गोष्ट जावेद अख्तर यांनी त्यांचा मुलगा फरहानला का सांगितली नाही, जेव्हा तो ‘मिर्झापूर’सारखी सीरिज बनवत होता. त्या सीरिजमध्ये जगातल्या सगळ्या शिव्यांचा वापर करण्यात आला आहे अन् मला ती सीरिज पूर्णपणे बघवलीही गेली नाही. तुम्ही जर ती सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल, असं संदीप रेड्डी वांगा म्हणाले होते.
संदीप यांच्या याच प्रत्युत्तरावर आता जावदे अख्तर भडकले. ते म्हणाले, “मी चित्रपट निर्मात्यांवर अजिबात टीका करत नव्हतो. मला असं वाटतं लोकशाही असलेल्या या समाजात एक ‘अॅनिमल’ चित्रपट नव्हे तर अनेक ‘अॅनिमल’सारखे चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे. मला प्रेक्षकांची काळजी आहे, निर्मात्यांची नाही. त्यांना कोणतेही चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे. हा चित्रपट बघून लोक जे काही सेलिब्रेशन करत होते, ते पाहून मी चिंता व्यक्त केली होती. माझं मत संदीप रेड्डी वांगा यांची क्रिएटिव्ह इंडिपेंडेंस कमी करणं नव्हतं. चित्रपटातील प्रेक्षकांची धारण आणि सामाजिक संदेशाबाबत जागरुकता वाढवणे हा यामागचा उद्देश होता.”
पुढे जावदे अख्तर म्हणाले, “संदीप रेड्डी वांगाने उत्तर दिलं ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्या ५३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना काहीच वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह सापडलं नाही. माझा एकही चित्रपट, एकही स्क्रिप्ट, एकही सीन, एकही संवाद, एकही गाणं टीका करायला मिळालं नाही. त्यामुळेच कदाचित त्यांना माझा मुलगा फरहानच्या ऑफिसमध्ये जाऊन एक टीव्ही मालिका शोधावी लागली. ज्यामध्ये फरहानने ना अभिनय केला, ना दिग्दर्शन केलं, ना लेखन केलं. फरहानच्या कंपनीने ‘मिर्झापूर’ केला आहे. एक्सलसारखी मोठी कंपनी खूप गोष्टी बनवत असते. त्यापैकी ही एक होती. माझ्या ५३ वर्षांच्या कारकिर्दीत तुम्हाला काही कसं मिळालं नाही? किती लाजिरवाणी गोष्ट आहे.”