ज्येष्ठ गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांना दोन अपत्ये आहेत. त्यांचा मुलगा फरहान अख्तर अभिनेता व दिग्दर्शक आहे तर मुलगी झोया अख्तर चित्रपट निर्माती आहे. जावेद यांनी मुलांना धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढवले. आपल्या मुलांना मूल्ये शिकवत बसण्याऐवजी स्वतःच्या वागण्यातून उदारहरणं घालून देण्याचा निर्णय घेतला, असं जावेद म्हणाले. तसेच फरहानने त्याच्या मुली शाक्य आणि अकिरा यांच्या जन्म प्रमाणपत्रावर धर्माच्या चौकटीत ‘नॉट अॅप्लिकेबल’ म्हणजेच ‘गैरलागू’ असं लिहिलं आहे, असंही यावेळी जावेद अख्तर यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

‘सायरस सेज’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांना त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलेल्या जीवनातील महत्त्वाच्या धड्यांबद्दल विचारण्यात आले. त्याचं उत्तर देत जावेद म्हणाले, “मला वाटत नाही की तुम्ही क्रॅश कोर्समध्ये मुलांना सगळं शिकवू शकता, कारण ते शक्य नाही. तुम्ही त्यांना जे करायला सांगता ते मुलं करत नाहीत, तुम्ही जे करता ते पाहून मुलं त्या गोष्टी करतात. तुमची नैतिक मूल्ये काय आहेत, तुमचे विचार काय आहेत, तुम्ही जीवनात कशाचा आदर करतात हे ते पाहतात, त्यावरून ते या सगळ्या गोष्टी शिकतात.”

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

आपण आचरणात आणलेली नैतिक मूल्ये आपल्या मुलांनी स्वीकारली आहेत असा खुलासा जावेद अख्तर यांनी केला. ते म्हणाले, “माझी दोन्ही मुलं नास्तिक आहेत. खरं तर फरहानने त्याच्या मुलींच्या जन्म प्रमाणपत्रावर धर्माच्या रकान्यात ‘नॉट अॅप्लिकेबल’ म्हणजेच कोणताही धर्म लागू नाही, असं लिहिलं आहे.”

“जी नैतिकता, ज्या प्रकारचा अॅटिट्युड आपल्या सभोवताली असतो त्यावरून दोन गोष्टी घडतात. एकतर तुम्हाला त्याचा इतका राग येतो की तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध होता किंवा तुम्ही ते आत्मसात करता,” असं जावेद अख्तर म्हणाले. आपली मुलं पालकांना बघून गोष्टी शिकत तेच आचरणात आणत असल्याचं जावेद यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar reveals farhan akhtar wrote not applicable in daughters birth certificates religion section hrc
Show comments