अभिनेता सुशांत सिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचं प्रकरण खूप गाजलं होतं. याच दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली होती. जावेद अख्तर यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप कंगनाने केला होता. आता तीन वर्षांनी १२ जून रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली, सुनावणीदरम्यान जावेद अख्तर यांनी कंगनाने केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा- ‘संदेसे आते है’ या गाण्यानंतर जावेद अख्तर यांनी मागितलेली अनु मलिक यांची स्वाक्षरी; नेमका किस्सा जाणून घ्या

सोमवारी सुनावणीदरम्यान जावेद अख्तर मुंबईतील अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात हजर झाले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये कंगनाने एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अख्तर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप कंगनाने केला होता. या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी कंगना हिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. सोमवारी अख्तर यांची या प्रकरणी साक्ष नोंदवण्यात आली. त्या वेळी कंगनाने बदनामी करणारे वक्तव्य केल्याचे अख्तर यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच या मुलाखतीत कंगना जे काही बोलली ते सगळं खोटे असल्याचेही जावेद अख्तर म्हणाले.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत जावेद अख्तर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, “माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी लखनऊचा आहे आणि कोणालाही एकेरी नावाने हाक मारत नाही. माझ्यापेक्षा तीस-चाळीस वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तींनाही ‘आप’ म्हणूनच संबोधत आलो आहे, तरीही माझ्यावर झालेले आरोप ऐकून मला खूप आश्चर्य वाटते.”

हेही वाचा- “तू सिगारेट सोडलीस का?” शाहरुख खानने दिलेले उत्तर पाहून चाहते चक्रावले, म्हणाले “जरा काळजी…”

काय आहे नेमके प्रकरण?

२०२० मध्ये जेव्हा सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. तेव्हा कंगनाने एका वाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कंगना म्हणाली, “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले आणि सांगितले की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंब खूप मोठे लोक आहेत. जर तुम्ही त्यांची माफी मागितली नाही तर तुम्ही तुरुंगात जाल आणि शेवटी विनाशाचा एकच मार्ग असेल. तो म्हणजे तुम्ही आत्महत्या कराल. त्या वेळी त्यांचे हे शब्द ऐकून मी हादरले होते”. इतकेच नाही तर कंगनाने जावेद यांच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही केला होता.

Story img Loader