‘द इंडियन एक्स्प्रेस’ची ‘एक्सप्रेसो’ ही सीरिज यावर्षी सुरू करण्यात आली. या सीरिजच्या पहिल्या भागात विद्या बालन व प्रतीक गांधी पाहुणे म्हणून आले होते. दुसऱ्या भागात तापसी पन्नूने इम्तियाज अलीसह हजेरी लावली होती. दोघांनी करिअरपासून ते सिनेसृष्टीबद्दलच्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या होत्या. आता नवीन भागात जावेद अख्तर आणि त्यांची मुलगी झोया अख्तर पाहुणे आहेत. दोघेही आज २९ ऑगस्ट रोजी एक्सप्रेसोमध्ये सहभागी झाले आहेत.
‘एक्सप्रेसो’ हा इंडियन एक्सप्रेसचा तास-दीड तासांचा लाइव्ह कार्यक्रम आहे. यात प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळते. या मुलाखतीत जावेद अख्तर व झोया करिअर, आयुष्य, चित्रपट, साहित्य, प्रेम आणि आवडत्या गोष्टींसह अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहेत. कार्यक्रम तुम्हाला खाली दिलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल.
जावेद अख्तर व झोया अख्तर दोघांचे या सिनेसृष्टीत मोलाचे योगदान राहिले आहे. यांची ही खास मुलाखत नक्की पाहा.
© IE Online Media Services (P) Ltd