शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शन होऊन १३ दिवस झाले असतानाही अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अशातच चित्रपटाच्या १३ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “आता सुपरस्टार होणं कठीण झालंय”, नाना पाटेकर यांनी बॉलीवूडविषयी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून…”

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, जवानने १३ व्या दिवशी ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ७७.८३ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ८०.१ कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी ३२.९२ कोटी रुपये कमावले होते. सहाव्या दिवशी २६ कोटी, सातव्या दिवशी २३.२ कोटी, आठव्या दिवशी २१.६ कोटी. नवव्या दिवशी १९.१ कोटी. १०व्या दिवशी ३१. ८ कोटी, ११व्या दिवशी ३६.८५ कोटी, १२ व्या दिवशी १५.२५ कोटी आणि आता १३व्या दिवशी चित्रपटाने व्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर ‘जवान’ची एकूण कमाई आता ५०७.८८ कोटी झाली आहे.

हेही वाचा- ‘जवान’च्या सेटवर पहिल्या दिवशी ‘असा’ होता दीपिका पदुकोणचा लूक; दिग्दर्शक अ‍ॅटली म्हणाला, “कोणत्याही अभिनेत्रीला…”

जगभरात जवानने ८८० कोटींचा व्यवसाय केला आहे. ११ दिवसांमध्ये या चित्रपटाने जगभरात ८६० कोटींची कमाई केली होती. १३ दिवसात या चित्रपटाचे विदेशी बॉक्स ऑफिसवर २८६ कोटींचा गल्ला जमवला आहे.

कमाईच्या बाबतीत जवानने गदर २ आणि पठाणलाही मागे टाकले आहे. ५०० कोटींची कमाई करायला ‘पठाण’ला २८ दिवस लागले होते तर ‘गदर २’ ला २४ दिवस लागले होते. साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहुबली २’ चित्रपटालाही ५०० कोटींचा व्यवसाय करायला ३४ दिवस लागले होते. त्यामुळे ‘जवान’ सगळ्यात जलद ५०० कोटींची कमाई करणारा पहिला बॉलीवूड चित्रपट बनला आहे.

हेही वाचा- सुधा मूर्तींनी पाहिला ‘द व्हॅक्सिन वॉर’; प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “कोव्हॅक्सिन म्हणजे काय हे सामान्य माणसाला समजणार नाही, पण…”

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात त्याचे पाच लूक पाहायला मिळतात. त्याशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरीजा ओक, रिद्धी डोग्रा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणेतील आघाडीचा दिग्दर्शक अॅटलीने केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan box office collection day 13 shahrukh khan film earned 507 crore dpj
Show comments