शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत आणि चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहिल्यास प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम दिसून येतं. ‘जवान’ने अवघ्या पाच दिवसात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची सोमवारची आकडेवारी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जवान’ने रविवारी रचला इतिहास! चौथ्या दिवशी केली जबरदस्त कमाई; ‘पठाण’सह ‘KGF 2’, ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड मोडला, वाचा आकडे

शाहरुख खानच्या ‘जवान’ने अवघ्या चार दिवसांत जेवढी कमाई केली तेवढी कमाई बरेच चित्रपट करू शकलेले नाहीत. या चित्रपटाची क्रेझ त्याच्या रोजच्या आकडेवारीवरून दिसून येते. सोमवारी भारत-पाकिस्तान सामना असूनही चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. यासोबतच चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ‘जवान’ने रविवारी ८०.१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ज्यामध्ये सर्वाधिक ७१.६३ कोटींचे कलेक्शन हिंदी व्हर्जनमध्ये, ५ कोटी तमिळमध्ये आणि ३.४७ कोटी तेलुगूमध्ये आहे. आता ‘जवान’ची सोमवारची आकडेवारी आली आहे.

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘जवान’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी तब्बल ३० कोटी रुपये कमावले आहेत. याबरोबरच ‘जवान’चे पाच दिवसांचे एकूण कलेक्शन ३१६.१६ कोटी रुपये झाले आहे. ‘जवान’ने अवघ्या पाच दिवसात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा या वर्षी ३०० कोटींचा टप्पा ओलांडणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.

‘जवान’ने सोमवारी चांगली कमाई केली असली तरी चित्रपट आपल्या पहिल्या सोमवारच्या कमाईसह ‘गदर २’ चा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही. ‘गदर २’ ने पहिल्या सोमवारी ३८.७ कोटी रुपये कमावले होते. मात्र, ‘जवान’ने पहिल्या सोमवारी ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या सोमवारी ‘पठाण’चे कलेक्शन २६.५ कोटी रुपये होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan box office collection day 5 shahrukh khan film earns 30 crore on monday hrc
First published on: 12-09-2023 at 07:24 IST