बॉयकॉट ट्रेंड पुन्हा जोर धरू लागला आहे. आदिपुरुष पाठोपाठ शाहरुख खानच्या येणाऱ्या चित्रपटालाही बॉयकॉट करायची मागणी होताना दिसत आहे. शाहरुखचा ‘पठाण’ प्रदर्शनासाठी सज्ज असून त्याच्या ‘जवान’ या चित्रपटावर काम सुरू आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटाचा टीझर लोकांना पसंत पडला. आता नुकतंच अ‍ॅटली आणि शाहरुखने दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याची भेट घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

शाहरुख आणि विजय यांची या महिन्यातील ही दुसरी भेट असल्याचं म्हंटलं जात आहे. याआधी दोघे अ‍ॅटलीच्या वाढदिवसानिमित्त भेटले होते आणि तेव्हाच फोटो अॅटलीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला होता. या फोटोमुळे ‘जवान’मध्ये विजय छोट्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. विजय याआधी अक्षय कुमारच्या ‘रावडी राठोड’मध्येही पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.

आता विजय आणि शाहरुखची ‘वारीसु’ चित्रपटाच्या सेटवर भेट झाली असल्याने पुन्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. तब्बल २ तास विजय आणि शाहरुख यांच्यात चर्चा सुरू होत्या आणि बरोबर अ‍ॅटलीदेखील होता. ‘वारीसु’मधील अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर विजय एका डान्स नंबरचं चित्रीकरण करत असल्याचं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : आर्यन खान करणार मनोरंजनसृष्टीत पदार्पण; पण अभिनेता म्हणून नाही तर…

शाहरुख सध्या ‘जवान’च्या चित्रीकरणानिमित्त चेन्नईमध्ये आहे. चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याची बातमी समोर आली आहे. शाहरुख या चित्रपटात एका वेगळ्याच अवतारात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यात मुख्य भूमिकेत आहे. तसेच सुपरस्टार विजय सेतुपतीदेखील या चित्रपटात दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. जवान २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader