Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट उद्या, १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या मुंबईतील अँटिलिया बंगल्यावर लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. मामेरू, संगीत, हळदी, मेहंदी समारंभानंतर काल शिव शक्ती पूजा पार पडली. या पूजेला देखील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण सध्या ‘जवान’ चित्रपट दिग्दर्शक अ‍ॅटलीचा व अभिनेता विकी कौशलचा डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा ५ जुलैला मोठ्या थाटामाटात संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला मुकेश अंबानींनी ८३ कोटी खर्चून खास जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स आयोजित केला होता. तसंच बॉलीवूड सेलिब्रिटींनी जबरदस्त डान्स केला. यानंतर बादशाह व करण औजला गाण्यांवर सेलिब्रिटी थिरकताना दिसले. अ‍ॅटली आणि विकी कौशलने देखील जबरदस्त डान्स केला.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”

हेही वाचा – Video: “तुझा अभिमान आहे”, हेमांगी कवीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून मधुराणी प्रभुलकरची प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं नेमकं काय केलं? जाणून घ्या…

सध्या विकी कौशलचं ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाणं खूप ट्रेंड होतं आहे. या गाण्यातील हूकस्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हेच लोकप्रिय गाणं अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात बादशाह व करण औजलाने गायलं. तेव्हा अ‍ॅटली व विकी कौशल ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप करताना दिसले. यावेळी दोघांबरोबर दिशा पटानी, अर्जुन कपूर, सारा अली खान पाहायला मिळाले. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील अ‍ॅटली व विकीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: जंतर मंतर बाई गं…, पूजा सावंत व तिच्या बहिणीचा सुकन्या मोनेंसह जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी दोघं लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader