दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. ‘जवान’च्या माध्यमातून नयनताराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तामिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. परंतु, अभिनयाचा प्रवास सुरु करण्यापूर्वी नयनतारा कोणत्या क्षेत्रात काम करायची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया…
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची पहिली झलक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
नयनताराचा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री टीव्ही अँकर म्हणून काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नयनतारा प्रेक्षकांना फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित टिप्स देत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामध्ये ती मल्याळम भाषा बोलत आहेत.
नयनताराने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढे, २००५ मध्ये तिने ‘अय्या’ या तामिळ चित्रपटात काम केलं आणि २००६ मध्ये तिने लक्ष्मी चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘जवान’च्या यशानंतर अभिनेत्रीचा जुना टीव्ही अँकर म्हणून काम करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचं नशीब उजळलं, आता दिसणार वेब सिरीजमध्ये, म्हणाली…
नयनताराच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “ती गेल्या काही वर्षांत खूपच बदलली आहे”, “आज नयनतारा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाते.”, “आधी ती खूप वेगळी दिसायची”, “पैसा आला की माणूस बदलतो”, अशा प्रकराच्या कमेंट्स अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : राज ठाकरेंनी केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक! म्हणाले, “स्वतःचं मुस्लिम नाव-आडनाव लपवण्याच्या भानगडीत…”
दरम्यान, एकेकाळी टीव्ही अँकर म्हणून काम करणाऱ्या नयनताराची संपत्ती आजच्या घडीला जवळपास १८३ कोटींच्या घरात आहे. तिच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत नयनताराने ‘विश्वासम’, ‘नानुम राउडी धान’, ‘चंद्रमुखी’, ‘दरबार’, ‘अरम्म’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.