शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. नुकताच हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अनेक व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. पण आता या चित्रपटातून डिलीट केलेले सीन्स लीक झाले आहेत.

जवान हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते खूप गर्दी करत आहेत. या चित्रपटातील ॲक्शन, कलाकारांची कामं, गाणी, कथा, संवाद या सर्वांनाच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण या चित्रपटातून कट केले गेलेले काही सीन्स आता समोर आले आहेत.

हेही वाचा : “निर्मात्यांनी आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं की…”, गिरीजा ओकचा ‘जवान’बद्दल मोठा खुलासा

सध्या सोशल मीडियावर ‘जवान’मधील काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. परंतु व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्यं चित्रपटात दाखवली गेलेली नाहीत. चित्रपटगृहात जवान पाहिलेला शाहरुखच्या चाहत्यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे की व्हायरल होणाऱ्या या क्लिप्स चित्रपटातील डिलीट केलेल्या सीन्सच्या आहेत.

आणखी वाचा : “शाहरुख खान आणि ॲटली यांनी जबरदस्तीने…”, ‘जवान’मधील कलाकाराचा मोठा खुलासा

या क्लिप्समध्ये नयनतारा आणि शाहरुखचे काही ॲक्शन सीन्स आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता ओटीटीवर जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा हे डिलीट केलेले सीन्स त्यात समाविष्ट केले जाणार की नाही यावर आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यामुळे ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘जवान’मध्ये नयनतारा आणि शाहरुखचा आणखीनच वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं बोललं जात आहे.

Story img Loader