बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये आज (७ सप्टेंबर) प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचे चाहते पहाटेपासूनच चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सबाहेर गर्दी करत आहेत. अनेक चाहते फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पोहोचले असून ते ‘जवान’बद्दल ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले रिव्ह्यू देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: ‘जवान’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ; तिकीट खरेदीसाठी रात्री २ वाजता चित्रपटगृहाबाहेर गर्दी, पाहा व्हिडीओ

ज्या लोकांनी चित्रपट पाहण्यास सुरुवात केली आहे ते सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. ‘जवान’मध्ये शाहरुख खानबरोबर नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अॅटली दिग्दर्शित जवानची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. तसेच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. हा सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटलाय, याचे ट्विटर रिव्ह्यू समोर आले आहेत, ते पाहुयात.

जवान पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया –


दरम्यान, शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. पहाटेपासूनच प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, तसेच सेलिब्रेशनही करत आहेत. किंग खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट किती दमदार ओपनिंग करतो, हे लवकरच कळेल.