शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘जवान’ चित्रपटाने सगळे रेकॉर्ड्स मोडत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाची जबाबदारी दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीने सांभाळली होती. ‘जवान’ प्रदर्शित होण्यापूर्वी अनेकांनी यामध्ये थलपती विजयचा कॅमिओ असण्याची शक्यता वर्तवली होती. यासंदर्भात आता दिग्दर्शक अ‍ॅटलीने माहिती दिली आहे.

हेही वाचा : करण जोहरला मिळालेली अंडरवर्ल्डकडून धमकी, शाहरुख खानने मित्राला दिली ‘अशी’ साथ; म्हणाला, “बंदुकीच्या गोळ्या…”

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
Actor Nakul Ghanekar shares his experience of learning Kathak
Video: “नाच्या, बायल्या, छक्का म्हणायचे”, अभिनेत्याने सांगितला कथ्थक शिकतानाचा अनुभव, म्हणाला, “२० वर्षापूर्वी…”
Malayalam director Ranjith quits as head of Kerala Chalachitra Academy after Bengali actress accused him of misbehaving with her in 2009
“बेडरूममध्ये बोलावून स्पर्श करू लागला अन्…”, मल्याळम दिग्दर्शकावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप, KCAच्या अध्यक्ष पदाचा द्यावा लागला राजीनामा
Lakshamikant Berde
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला ‘हा’ सल्ला; अभिनेता आठवण सांगत म्हणाला, “लक्ष्यामामाने….”
Ranbir Kapoor for the role of Rama in Ramayan
‘रामायण’मध्ये रामाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने रणबीर कपूरला का निवडलं? मुकेश छाब्राने केला खुलासा
Aishwarya Rai Salman Khan in josh
सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटली पिंकविलाशी संवाद साधताना म्हणाला, “आतापर्यंत मी माझ्या कोणत्याच चित्रपटाचा सीक्वेल बनवलेला नाही. पण, ‘जवान’च्या कथानकात भविष्यात मला काही भन्नाट गोष्टी सुचल्या, तर मी नक्कीच दुसरा भाग बनवण्याचा विचार करेन.”

‘जवान’मध्ये शेवटी विजय सेतुपती अर्थात ‘काली’ला मारल्यानंतर शाहरुख खानची दोन्ही पात्रे म्हणजेच विक्रम सिंह राठौर आणि आझाद पुढील मिशनबद्दल बोलताना दिसतात. त्यामुळे लवकरच जवानच्या सीक्वेलसाठी चांगलं कथानक शोधून काम सुरु करणार असल्याचं अ‍ॅटलीने सांगितलं.

हेही वाचा : “संस्कृतीने नटलेला भारत माझा…”, संकर्षण कऱ्हाडेने सातासमुद्रापार अमेरिकेत सादर केली देशभक्तीपर कविता, सर्वत्र होतंय कौतुक

विजय थलपतीचा ‘जवान’मध्ये कॅमिओ असणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. परंतु प्रत्यक्ष चित्रपटात त्याचा कॅमिओ नव्हता याविषयी सांगताना अ‍ॅटली म्हणाला, “मी थलपती विजयला कॅमिओ करण्यास सांगितले नाही याचं मुख्य कारण म्हणजे मी शाहरुख सर आणि विजय सरांसाठी यापेक्षा वेगळ्या कथानकाचा विचार करेन. त्या दोघांमुळे माझ्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे विजय आणि शाहरुख सरांसाठी नवीन स्क्रिप्ट घेऊन मी एक वेगळा चित्रपट करेन.”

हेही वाचा : “आकर्षक सजावट, मोदक अन्…”, ‘ठरलं तर मग’च्या सेटवर गणेशोत्सवाची तयारी, जुई गडकरीने शेअर केली खास झलक

दरम्यान, अ‍ॅटली आणि थलपती विजय यांनी एकत्र तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच ७ सप्टेंबरला रिलीज झालेल्या ‘जवान’ चित्रपटाने देशभरात ४४०.४८ कोटींची कमाई केली असून जगभरात ७३५ कोटी कमावले आहेत.