शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीत ‘पठाण’ चित्रपट रिलीज झाल्यापासूनच ‘जवान’ची चर्चा रंगली होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अ‍ॅटलीने सांभाळली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अ‍ॅटलीला ओळखले जाते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात ‘जवान’बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : पैसे थकवल्याने संतापली गौतमी देशपांडे; स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली, “स्वत:च्या पैशांसाठी…”

reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘जवान’च्या प्रिव्ह्यू व्हिडीओमध्ये गिरीजाची बंदूक चालवतानाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. चित्रपट प्रदर्शनाला काही दिवस बाकी राहिलेले असताना आता गिरीजा ओकने सोशल मीडियावर नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुखचे ५ वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : सायलीच्या पायावरची जन्मखूण कोणाला दिसणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, जुई गडकरी म्हणाली…

गिरीजाने शाहरुखच्या लूकचा व्हिडीओ शेअर करत, “प्रत्येक चेहऱ्यामागचे रहस्य उलगडण्याची वेळ आली आहे! जवान ७ सप्टेंबरला येणार तुमच्या भेटीला…असे कॅप्शन दिले आहे.” या व्हिडीओमध्ये शाहरुखचे पाच वेगवेगळे लूक्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या लूकमध्ये शाहरुखच्या डोळ्यात राग दिसत आहे. दुसऱ्या लूकमध्ये डोळ्यावर चष्मा, पांढरी दाढी असलेला शाहरुख पाहायला मिळत आहे. तिसरा लूक काहीसा तरुणपणीचा वाटत आहे. चौथ्या फोटोमध्ये किंग खानच्या चेहऱ्यावर मास्क आहे आणि शेवटी शाहरुख खानचा टक्कल असलेला लूक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “तुझी स्टाईल अन् बोलणं ‘ढोलकीच्या तालावर’ या मंचाला शोभणार नाही असं म्हणाले होते तेव्हा…”; अक्षय केळकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच ‘जवान’ चित्रपटाचे ओटीटी अधिकार २५० कोटींना विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ७ सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader