Jawan movie New Poster : ‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सध्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या येत्या ७ सप्टेंबरला भेटीला येणार आहे. शाहरुखने नुकतेच सोशल मीडियावर जवान चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये किंग खानचा हटके लूक पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सेलिब्रिटी बहिणींची भांडणं होतात का?”, नेटकऱ्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेने दिले भन्नाट उत्तर; म्हणाली, “कोणत्याही बहिणी…”

‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बरोबर ३० दिवस बाकी राहिलेले असताना शाहरुखने हे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये शाहरुखच्या डोक्यावर टक्कल, हातात बंदूक, डोळ्याला गॉगल असा हटके लूक पाहायला मिळत आहेत. हे नवीन पोस्टर शेअर करत शाहरुख लिहितो, “मी चांगला आहे की वाईट? (मैं अच्छा हूं या बुरा हूं) फक्त ३० दिवस बाकी…तुम्ही तयार आहात ना?”

हेही वाचा : “मी पहिल्यांदा सासूसमोर ‘पाडाला पिकला आंबा’ म्हटलं अन्…” वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा, म्हणाल्या “नवऱ्याची मान…”

बहुचर्चित ‘जवान’ आजपासून बरोबर ३० दिवसांनी म्हणजेच ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. शाहरुखच्या दुहेरी भूमिका असल्याने खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने टक्कल केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : “तुला घट्ट मिठी आणि…”, ‘रॉकी और रानी’ पाहिल्यावर सई ताम्हणकर भारावली, क्षिती जोगसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, अभिनेते विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅटलीने केले असून याची निर्मिती गौरी खानने केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan movie shah rukh khan shared new poster in bald look sva 00