शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘जवान’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “गुडघ्यावर जखमा, इंजेक्शन घेतलं अन्…”, ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यासाठी रवीना टंडनने घेतली ‘अशी’ मेहनत, म्हणाली…

सोशल मीडियावर शाहरुख खानला त्याच्या चाहत्याने “जवानमध्ये एवढ्या मुली का आहेत?” असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “या सगळ्या गोष्टी तू का मोजत आहेस? माझ्या भूमिका किती आहेत त्या मोजा…मनात प्रेम आणि विश्वास ठेवा. तसंच आपल्या आई आणि मुलींचा सन्मान करत भविष्यात पुढे चला.”

हेही वाचा : शाहरुखचा ‘जवान’ सनीच्या ‘गदर २’वर भारी; तिसऱ्या दिवशी ‘इतक्या’ कोटींचा गल्ला जमवत मोडले ‘हे’ रेकॉर्ड

सध्या शाहरुख खानने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. नेटकरी किंग खानचं कौतुक करत आहेत. ‘जवान’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, ऋतुजा शिंदे, नयनतारा या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा : “माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा…”, किरण मानेंनी शाहरुख खानसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भावा तुझा…”

दरम्यान, शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी एका दिवसात ७४.५ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांमध्ये चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सध्या शाहरुखसह चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटलीचं कौतुक करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan movie shah rukh khan shuts down fan who asks itni ladkiyan kyun hai film mein sva 00