बॉलीवूडच्या किंग खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. अशातच दुसऱ्याबाजूला ‘जवान’ चित्रपटाचा संगीतकार अनिरुद्ध रविचंदर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश हिला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण आता यावर अभिनेत्री कीर्तिनं आणि तिच्या वडिलांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “भीती वाटली पण…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने शेअर केला मालिकेच्या शुटींगदरम्यानचा अनुभव, म्हणाली…

अनिरुद्ध रविचंदर हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. त्यानं शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण अशातच त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहे. अभिनेत्री कीर्ति सुरेशला डेट करत असून लवकरच अनिरुद्ध लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु कीर्तिनं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘टाइम्स नाउ’शी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली की, “ही चुकीची बातमी आहे. अनिरुद्ध माझा चांगला मित्र आहे.”

हेही वाचा – Video: परिणीती चोप्रा पापाराझींवर भडकली; हात जोडून म्हणाली, “मी तुम्हाला…”

तसेच कीर्तिचे वडील सुरेश कुमार यांनीही या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना ते म्हणाले की, “या बातम्या निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही.”

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मराठी मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप; आज प्रसारित होणार शेवटचा भाग

दरम्यान, अनिरुद्ध व कीर्तिच्या लग्नाच्या अफवा यापूर्वीही देखील पसरल्या होत्या. अनिरुद्ध व कीर्तिनं ‘रेमो’, ‘थाना सेरंधा कूटम’, ‘अग्न्यावथवासी’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोघं खूप चांगले आणि जवळचे मित्र आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan music composer anirudh ravichander wedding with south famous actress keerthy suresh pps