शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाची गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या पहिल्याच टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड केवळ ‘जवान’ चित्रपट मोडू शकतो असा दावा अनेकदा शाहरुखसह त्याच्या चाहत्यांनी केला आहे. याच बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

हेही वाचा : Jawan Prevue: “मैं पुण्य हूँ या पाप?”, शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर रिलीज; दीपिका, नयनतारासह झळकणार ‘हे’ कलाकार

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

‘जवान’ चित्रपटाच्या प्रिव्ह्यू ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शाहरुखचा अभिनय, चित्रपटाची स्टारकास्ट याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्यात चित्रपटातील काही सीन्स नेटकऱ्यांनी चांगलेच लक्षात ठेवले आहेत. ट्रेलरमध्ये सुरुवातीला शाहरुख “मैं मॉं को किया हुँआ वादा हूँ, या अधुरा हूँ…” हा संवाद बोलताना दिसत आहे. हा संवाद सुरु असताना ट्रेलरमध्ये एक बाई तिच्या लहान बाळाला उचलून जनतेसमक्ष दाखवते असे दृश्य दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपट YouTube वर झाला लीक, काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

‘जवान’मधील या सीनचा संदर्भ नेटकऱ्यांनी थेट ‘बाहुबली’ चित्रपटाशी जोडला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात सुद्धा राजमाता शिवगामी (राम्या कृष्णन) छोट्या बाळाला जनतेसमोर उचलून आता हाच तुमचा राजा आहे असे दाखवतात. त्यामुळे ‘जवान’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटातील हा सीन सेम टू सेम असल्याचा दावा ट्विटरवर काही नेटकऱ्यांनी केला आहे. ट्विटरवर यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने ट्वीट करत “बॉलीवूड अभिनेते नेहमीच दाक्षिणात्य चित्रपटातून काही सीन्स घेतात” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Jawan Prevue
Jawan Prevue

हेही वाचा : “‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर माझी आई रडली अन् आदेश…” सुचित्रा बांदेकरांनी सांगितली नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया

जवानच्या ट्रेलरमधील तीन दृश्यांवरून सध्या सोशल मीडियावर वाद सुरु आहेत. शाहरुखने तोंडावर अर्धा मास्क लावलेला सीन ‘अपरिचित’ चित्रपटातील, बाळाचा सीन ‘बाहुबली’ चित्रपटातील आहे. तसेच अंगावर पट्ट्या बांधलेल्या सीन ‘डार्क नाईट’मधून घेतल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे. याउलट दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी शाहरुखला पाठिंबा दर्शवणारे ट्वीट केले आहेत.

बाहुबली, अपरिचित, डार्क नाइट

दरम्यान, ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Story img Loader