‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. टीझरनंतर नुकताच किंग खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रिव्ह्यू ट्रेलरमध्ये बरेच अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : “जिया खान प्रकरणातील अशा गोष्टी…”, निर्दोष मुक्त झालेल्या सूरज पंचोलीचे वक्तव्य; ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबाबतही दिलं उत्तर

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”

‘जवान’ चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. दीपिका ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये साडी नेसून एक अ‍ॅक्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी “जब मैं विलन बनता हूँ ना…” या वाक्याने शाहरुखने त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपट YouTube वर झाला लीक, काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

चित्रपटात शाहरुख नायक आहे की खलनायक, त्याचा डबल रोल असणार की नाही?, तो एक आर्मी ऑफिसर असेल का?, शाहरुख पुण्य करणार की पाप? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ७ सप्टेंबरला मिळणार आहेत.

‘जवान’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अ‍ॅटलीने सांभाळली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अ‍ॅटलीला ओळखले जाते. दिग्दर्शक अ‍ॅटली ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली असून सहनिर्माता गौरव वर्मा आहे.

दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच ‘जवान’ चित्रपटाचे ओटीटी अधिकार २५० कोटींना विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ७ सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader