‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. टीझरनंतर नुकताच किंग खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रिव्ह्यू ट्रेलरमध्ये बरेच अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘जवान’ चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. दीपिका ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये साडी नेसून एक अॅक्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी “जब मैं विलन बनता हूँ ना…” या वाक्याने शाहरुखने त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपट YouTube वर झाला लीक, काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज
चित्रपटात शाहरुख नायक आहे की खलनायक, त्याचा डबल रोल असणार की नाही?, तो एक आर्मी ऑफिसर असेल का?, शाहरुख पुण्य करणार की पाप? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ७ सप्टेंबरला मिळणार आहेत.
‘जवान’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अॅटलीने सांभाळली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अॅटलीला ओळखले जाते. दिग्दर्शक अॅटली ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली असून सहनिर्माता गौरव वर्मा आहे.
दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच ‘जवान’ चित्रपटाचे ओटीटी अधिकार २५० कोटींना विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ७ सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.