शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड्स मोडत जगभरात जवळपास १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशातच किंग खानने त्याच्या बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारी सुरु केली आहे. ‘डंकी’ हा चित्रपट अवैध स्थलांतर या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : “‘जवान’च्या कमाईचे आकडे खोटे?”, अखेर शाहरुख खानने सोडलं मौन, नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाला, “गप्प बस…”

शाहरुख खानने नुकतंच एक्सवर (ट्विटर) आस्क एसआरके सेशन घेतलं. किंग खान चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतानाचा डंकीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी ट्वीट करत शाहरुखची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.

“शूटिंगमधून वेळ मिळाल्यामुळे आता थोडावेळ मी तुमच्याशी गप्पा मारतो” असं ट्वीट करत अभिनेत्याने आस्क एसआरके सेशनची सुरुवात केली. अशातच राजकुमार हिरानी ट्वीट करत म्हणाले, “सर, आता बाथरुममधून बाहेर या…काय करताय? प्रेक्षकांना ट्रेलर दाखवावा लागेल.”

हेही वाचा : “मी खूप वाईट आहे ना?”, जिनिलियाच्या प्रश्नावर रितेश देशमुख म्हणाला “तुला माहिती…”; व्हिडीओ व्हायरल

राजकुमार हिरानींच्या ट्वीटवर उत्तर देत शाहरुख म्हणाला, “हो सर येतोच आहे…थोडावेळ मी माझ्या मित्रांबरोबर बोलत होतो. मित्र-मैत्रिणींनो मला माफ करा मला आता जावं लागेल, नाहीतर मला डंकीमधून काढून टाकतील. लवकरच भेटू चित्रपटगृहात! तुम्हाला सर्वांना खूप खूप प्रेम…”

हेही वाचा : अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ‘जवान’ फेम नयनतारा करायची ‘हे’ काम, जुना व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

‘डंकी’चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानमधील या संभाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन वर्षाखेरिस ठरलेल्या तारखेला ‘डंकी’ प्रदर्शित होईल असा अंदाज किंग खानच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या चित्रपटात शाहरुख खानबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Story img Loader