शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा- “मला राष्ट्रीय पुरस्कार…” शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा चर्चेत; सैफ अली खानशी केली तुलना

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन

भारतात जवानच्या ॲडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने दिल्लीत २.५ कोटी रुपये आणि मुंबईत १.५ कोटी रुपये कमावले आहेत. अनेक ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची तिकिटे २ हजार रुपयांना विकली जात आहेत. मात्र, भारतात अशी अनेक चित्रपटगृहे आहेत जिथे जवानची तिकिटे १०० रुपयांच्या आत उपलब्ध आहेत.

कोलकात्याच्या एका चित्रपटगृहामध्ये अवघ्या ६० रुपयांमध्ये जवान चित्रपटाची तिकिटे विकण्यात येत आहेत. कोलकात्याच्या बारासात येथील चित्रपटगृहात ही तिकीट विकली जात आहे. तर याच चित्रपटगृहातील बाल्कनीतील तिकिटांची किंमत केवळ ८० रुपये ठेवण्यात आली आहेत. तसेच कोलकात्यातील पद्मा आणि बारापूर चित्रपटगृहातही जवानची केवळ ६० रुपयांना तिकिट उपलब्ध आहेत. तर बसुश्री चित्रपटगृहामध्ये १०० आणि १५० रुपयांना तिकिट विकली जात आहेत.

हेही वाचा- “आपल्या वडिलांसारखं बनू नकोस”; सनी देओलचा लहान मुलगा राजवीरला आजोबा धर्मेंद्र यांनी दिला सल्ला, म्हणाले…

तर दुसरीकडे मुंबईत डोंगरी भागातील प्रमियर गोल्ड चित्रपटगृहात जवानची सगळ्यात कमी किंमतीत तिकिटे विकण्यात येत आहेत. या चित्रपटगृहात स्टॉल सीट्सची तिकिटे १०० रुपयांमध्ये आणि ड्रेस सर्कल सीट्सची तिकिटे ११२ रुपयांमध्ये विकली जात आहेत. तर चैन्नईतील एजीएस चित्रपटगृहामध्ये केवळ ६३ रुपयांमध्ये जवानची तिकिटे विकण्यात येत आहेत. दिल्लीतील अनेक चित्रपटगृहांमध्ये कमी किंमतीत जवानची तिकिटे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. दिल्लीतील शक्ति नगर परिसरातील अम्बा चित्रपटगृहांमध्ये केवळ ७५ रुपयाला जवानची तिकिटे उपलब्ध आहेत. तसेच पॉपुलर सिनेमा डिलाइट चित्रपटगृहामध्ये या तिकिटांची संख्या ९५ रुपये आहे.

हेही वाचा- गेल्या २० वर्षांपासून संजय दत्त शोधतोय अमीषा पटेलसाठी जोडीदार; म्हणाला, “तुझ्या लग्नात…”

‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.