शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड आवडल्याचं दिसत आहेत. शाहरुख खान या चित्रपटात वडील आणि मुलगा अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत असून नयनतारा, सान्या मल्होत्रा, दीपिका पदुकोण या अभिनेत्रीही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Jawan trailer: “जब मैं व्हिलन बनता हूं…” जबरदस्त अ‍ॅक्शनला देशभक्तीची जोड; शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

‘जवान’च्या एका सीनमध्ये शाहरुख खान ‘मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल’ असं म्हणताना दिसत आहे. यावर आता ट्विटर यूजर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘आम्हाला माहीत आहे की हा डायलॉग कोणासाठी आहे.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘हा समीर वानखेडेला इशारा आहे.’

पाहुयात ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रिया

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. तेव्हा किंग खान ‘जवान’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. नंतर आर्यनला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली होती.