Jawan Vs Animal : ‘पठाण’च्या घवघवीत यशानंतर शाहरुख खानचे चाहते त्याचे आगामी चित्रपट ‘डंकी’ आणि ‘जवान’साठी प्रचंड उत्सुक आहेत. नुकतंच शाहरुखच्या ‘जवान’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी मुंबईतील या चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटो बाहेर आले होते. असं म्हंटलं जात होतं की ‘जवान’ ठरल्याप्रमाणे २ जूनला प्रदर्शित होणार आहे, पण अजून चित्रपटाचं बरंच काम बाकी असल्याने त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

चित्रपटाच्या व्हीएफएक्सचं बरंच काम बाकी असल्याने आता ‘जवान’ ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हंटलं जात आहे. मीडिया रीपोर्टनुसार ‘जवान’ ११ ऑगस्टला प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘ॲनिमल’ आणि सनी देओलचा ‘गदर २’देखील प्रदर्शित होणार आहेत. ‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार जवानच्या नव्या प्रदर्शनाची तारीख समजल्यानंतर ॲनिमलच्या टीमने शाहरुख खानशी संपर्क साधल्याचं म्हंटलं जात आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Amit Shah Rally cancle
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”

आणखी वाचा : ‘पठाण’मधील शाहरुख-सलमानच्या ट्रेन सीनची पोलखोल; जॅकी चॅनच्या शोमधून सीन चोरल्याचा नेटकऱ्यांचा दावा

सध्या याबाबतीत शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांच्यातही चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही मोठे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले याचा फटका दोघांनाही बसतो, त्यामुळे शाहरुखने त्याच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली तर नक्कीच हे नुकसान टळू शकेल अशीही चर्चा आहे. अद्याप याविषयी काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नेमकं कोण आपला चित्रपट पुढे ढकळणार ते येत्या काळात समजेलच. आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यादरम्यान शाहरुख खान ‘जवान’बद्दल मोठी घोषणा करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच या चित्रपटाचं प्रमोशन सुरू होणार आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यातही दीपिका पदूकोण अन् दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा कॅमिओ असण्याची शक्यता आहे.