समाजवादी पक्षाने अभिनेत्री जया बच्चन यांना उत्तर प्रदेशमधून पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. पाचव्यांदा त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. जया यांनी निवडणूक शपथपत्रात त्यांची आणि पती अमिताभ बच्चन यांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली आहे.

‘बिझनेस टुडे’च्या अहवालानुसार, जया यांनी निवडणूक शपथपत्रात घोषित केलं की २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांची वैयक्तिक संपत्ती १.६३ कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रात अमिताभ बच्चन यांची यावर्षीची एकूण संपत्ती २७३.७४ कोटी रुपये होती. जया बच्चन यांचे बँक बॅलेन्स १०.११ कोटी रुपये आणि अमिताभ यांचे बँक बॅलेन्स १२०.४५ कोटी रुपये आहे. त्यांची एकत्रित जंगम मालमत्ता ८४९.११ कोटी रुपये असून स्थावर मालमत्ता ७२९.७७ कोटी रुपये आहे.

amitabh bachchan company godha announced ipca will begin trial production in Hingani investing 250 crore rupees
अमिताभ बच्चनची कंपनी वर्ध्यात उद्योग सुरू करणार ? अशा घडल्या घडामोडी…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Amitabh Bachchan biography
लोक-लोलक : स्वत:ला बच्चन वगैरे समजणं!
aishwarya rai nimrat kaur abhishek bachchan
ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकसाठी केली पोस्ट, चाहते निम्रत कौरचा उल्लेख करत म्हणाले…
Tillotama Shome is bachchan family daughter in law
जया बच्चन यांची सून आहे ‘ही’ अभिनेत्री, २ वर्षे तुरुंगात कैद्यांबरोबर राहिली, आता आहे OTT क्वीन
aishwarya rai bachchan tried avoiding eye contact with ex boyfriend vivek oberoi
बच्चन घराण्याची सून झाल्यावर एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयला पाहून ऐश्वर्या राय झालेली अस्वस्थ, नेमकं काय घडलेलं? वाचा…
Aaradhya Bachchan
ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?
Jaya Bachchan News
Jaya Bachchan : जया बच्चन यांचं वक्तव्य, “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले आणि…”

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या एकत्रित मालमत्तेत विविध स्त्रोतांद्वारे मिळवलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. जया यांच्या संपत्तीच्या स्त्रोतांमध्ये त्यांनी जाहिरातींद्वारे कमावलेले पैसे, खासदार म्हणून त्यांचा पगार आणि अभिनेत्री म्हणून त्यांचे मानधन यांचा समावेश आहे. तर, अमिताभ यांच्या उत्पन्नाचे स्रोत अभिनेता म्हणून ते घेत असलेल्या मानधनाशिवाय व्याज, भाडे, डिव्हिडंट्स, भांडवली नफा आणि सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे मिळविलेला नफा यांचा समावेश आहे.

“मी आधी मॅडम म्हणायचो, पण आता…”, अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चनना ‘या’ नावाने मारतात हाक

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आणखी एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की जया यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांचे दागिने आणि ९.८२ लाख रुपयांची एक कार आहे. दुसरीकडे, अमिताभ यांच्याकडे ५४.७७ कोटी रुपयांचे दागिने आणि १७.६६ कोटी रुपयांच्या १६ गाड्या आहेत, ज्यात दोन मर्सिडीज आणि एक रेंज रोव्हरचा समावेश आहे.

२०१८ मध्ये, जया बच्चन यांनी पती अमिताभ बच्चन यांच्यासह १००० कोटी रुपयांची त्यांची एकत्रित मालमत्ता असल्याचं जाहीर केलं होतं.

Story img Loader