अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतं. सध्या त्यांची नात नव्या नवेली नंदा ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये नव्याने वैयक्तिक आयुष्यातील किस्सा चाहत्यांना सांगितला. एकदा तिने आपला भाऊ अगस्त्य आणि आजी जया बच्चन यांच्यासाठी पास्ता बनवला होता. परंतु, हा पास्त खाऊन या दोघांचेही डोळे पाणावले. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
‘व्हॉट द हेल नव्या’मध्ये नव्या तिची आई श्वेता नंदा व आजी जया यांच्याबरोबर गमतीदार किस्से शेअर करत असते. यावेळी बच्चन कुटुंबीयांच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत या तिघींनी चर्चा केली. नव्या म्हणाली, “मी एकदा अगस्त्य आणि आजीसाठी पास्ता बनवला होता. मी त्यात खूप जास्त मिरची मसाला टाकला होता. त्यामुळे हा पास्ता खाऊन दोघांच्या डोळ्यात पाणी आलं.”
नव्याला तिखट पदार्थ खायला खूप आवडतात. यामुळेच घरी तिने आलियो-इ-ओलियो हा पास्ता बनवला होता. हाच पास्ता खाऊन जया बच्चन व अगस्त्य यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बच्चन कुटुंबीयांना नव्याने बनवलेला आलू छिलका हा पदार्थ खूप आवडतो.
हेही वाचा : वंदना गुप्तेंनी माधुरी दीक्षितसमोर ठेवलेली ‘ही’ अट; किस्सा सांगत म्हणाल्या, “ती खूप घरंदाज, संसार सांभाळून…”
याशिवाय नव्याने बच्चन कुटुंबीयांच्या घरी बनवण्यात येणाऱ्या ‘नानी मां की खिचडी’, ‘मामा टोस्ट’, ‘नव्या के आलू काही’ या खास पदार्थांची नावं यावेळी सांगितली. तसेच अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त श्वेताच्या हातचा पास्ता आवडत असल्याचं देखील यावेळी नव्याने सांगितलं.
दरम्यान, नव्याबद्दल सांगायचं झालं, तर अमिताभ व जया बच्चन यांच्याप्रमाणे त्यांची नात नव्या नवेली नंदाही नेहमीच चर्चेत असते. नव्याचा चाहतावर्गही मोठा आहे. नव्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते.