अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या अभिनयाबरोबर रागीट स्वभावासाठी ओळखले जाते. त्या सातत्याने चिडचिड करताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना अनेकदा फटकारताना दिसतात. आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्या पुन्हा एकदा पापाराझींवर रागावताना दिसत आहे.

हेही वाचा- “एलॉन थांब…” ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर शाहिद कपूरचे ट्वीट, म्हणाला “माझ्या ब्लू टिकला हात…”

Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांच वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी चोप्रा यांच्या निवासस्थानी भेट घेत शोक व्यक्त करत आहेत. जया बच्चन यांनी चोप्रा यांच्या निवासस्थानी भेट देत शोक व्यक्त केला. जया बच्चन यांच्याबरोबर त्यांची मुलगी श्वेता बच्चनही होती. यावेळेसचा जया बच्चन यांचा एक व्ह्डिीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वीरल भयानी याने त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जया बच्चन यांना पाहिल्यानंतर पापाराझींनी त्यांचा व्हिडिओ आणि फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे जया बच्चन भडकल्या आणि त्यांनी पापाराझींनी लांब उभं राहण्यास सांगितले. एवढंच नाही तर, फोटो आणि व्हिडीओ क्लिक करत असल्यामुळे पापाराझींना जया बच्चन रागावतानाही व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा- आमिर खानबरोबरचा फोटो शेअर करत सलमान खानने दिल्या ईदच्या शुभेच्छा, म्हणाला…

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘माध्यामांचा शत्रू…’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘त्यांना नक्की त्रास तरी कोणता आहे. जया बच्चन यांनी पापाराझींना फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही अनेकदा त्यांनी पापाराझींना फटकारल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. का अज्ञात व्यक्तीने जया बच्चन यांचे न सांगता फोटो काढल्यामुळे अभिनेत्री प्रचंड भडकल्या. एवढंच नाही तर त्यांनी अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे… असं देखील म्हणाल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Story img Loader