दिग्गज अभिनेत्री जया बच्चन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असतात. कित्येकदा कॅमेऱ्यसमोरच त्यांचा राग अनावर झाला असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पापाराझी छायाचित्रकारांवरही त्या संतापल्या असल्याचं पाहायला मिळतं. आता पुन्हा असंच काहीसं घडलं आहे. जया बच्चन यांचा इंदौर विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”
जया बच्चन यांना राग अनावर
इंदौर विमानतळावर जया बच्चन व बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहून अनेकांनी गर्दी केली. दरम्यान पापाराझी छायाचित्रकारांनी जया बच्चन यांचे फोटो व व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. हे पाहून जया बच्चन भडकल्या. “कृपया माझे फोटो काढू नका. तुम्हाला इंग्रजी भाषा कळत नाही का?” असं जया बच्चन म्हणतात.
अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया
विमानतळावरील सुरक्षारक्षक पापाराझींना जया बच्चन यांचे फोटो काढू नका असं सांगतात. तसेच त्यांना लांब उभं राहण्यास सांगतात. दरम्यान जया बच्चन म्हणतात, “अशा लोकांना नोकरीवरुन काढलं पाहिजे.” जया बच्चन यांचं बोलणं ऐकून अमिताभ त्यांच्याकडे बघतात आणि पुढे निघून जातात.
अमिताभ त्याक्षणी जया बच्चन यांच्याकडे फक्त बघतात. पण त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. तुम्ही जया बच्चन यांना काही बोलला का नाहीत? असा प्रश्नही कमेंटच्या माध्यमातून अनेकांनी विचारला आहे. तर जया बच्चन यांना प्रसिद्धी देऊ नका असंही अनेकांनी म्हटलं आहे.