बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन आज चित्रपटसृष्टीपासून लांब असल्या तरी राजकारणात सक्रिय आहेत. जया आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन आज आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची जोडी बॉलिवूडमध्ये एवरग्रीन जोडी मानली जाते. दोघांची लव्ह स्टोरी जगप्रसिद्ध आहे. अमिताभ बच्चन किती रोमँटिक आहेत का? याबाबत जया बच्चन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा- दारूच्या नशेत स्वरा भास्करने शाहरुख खानला दिला होता त्रास; अभिनेत्रीने स्वत: सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “मी सगळ्यांसमोर..”
जया बच्चन म्हणाल्या की, मला अमिताभ बिलकूल रोमँटिक वाटत नाही. निदान त्यांच्याबरोबर नाही. ‘कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असती तर त्यांनी तिच्यासाठी फुले, वाईन आणण्यासाख्या गोष्टी केल्या असता. मात्र, माझ्याबरोबर त्यांनी या गोष्टी केल्या नसल्याचे जया बच्चन म्हणाल्या. जेव्हा जया आणि अमिताभ एकमेकांना डेट करत होतो. तेव्हा त्यांच्यात बोलणच व्हायचं नाही. अमिताभ यांना रोमान्स वेळेचा अपव्य वाटायचा.
जया आणि अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणी १९७० पासून सुरू झाली. पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. जया त्या काळातील सुपरस्टार होत्या तर अमिताभ बच्चन यांना म्हणावं तस बॉलिवूड जम बसवता आला नव्हता. जया यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत १९७३ मध्ये आलेल्या ‘अनामिका’ चित्रपटात काम केले होते. यानंतर दोघेही ‘जंजीर’ चित्रपटात एकत्र दिसले. जंजीरच्या आधीही एका मॅगझिनमध्ये जयाचा फोटो पाहून बिग बी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे सलग १२ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जर जंजीर चित्रपट हिट झाला ते तिला लंडनला टूरसाठी घेऊन जातील, असे सांगितले होते.
हा चित्रपट हिट ठरला. मात्र, त्याआधीच लंडनला जाण्याची ही बाब अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कानावर पडली. त्याचवेळी बिग बी वडिलांची परवानगी घेण्यासाठी आले असता हरिवंश राय यांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. हरिवंश राय म्हणाले की, कोणीही कुठेही जाण्यास आपला आक्षेप नाही, मात्र यासाठी अनिताभला जयासोबत लग्न करावे लागेल. मग तिला बायको बनवून कुठेही घेऊन जा. वडिलांच्या या आदेशानंतर अमिताभ बच्चन यांनी ३ जून १९७३ रोजी जया भादुरीसोबत लग्न केले.
तोपर्यंत सगळं ठीक होतं. त्यानंतर लग्नाच्या तीन वर्षानंतर रेखाने ‘दो अंजाने’ चित्रपटातून जया आणि अमिताभच्या नात्यात प्रवेश केला. बिग बी आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हिट झाल्यामुळे खऱ्या आयुष्यातही दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होऊ लागले होते. यानंतर १९८१ मध्ये ‘सिलसिला’ हा चित्रपट आला. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत रेखा आणि जया या दोघींचीही जोडी होती. तोपर्यंत अमित-रेखाच्या प्रेमाच्या चर्चांनाही वेग आला होता.
हेही वाचा- अनेक चित्रपट अयशस्वी, पण तरीही स्वरा भास्कर आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क
खरं तर, एकदा अमिताभ बच्चन शूटिंगसाठी बाहेर गेले होते, तेव्हा जया यांनी रेखाला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. या निमंत्रणाचा मान राखून घाबरणे योग्य आहे पण रेखाही तिथे पोहोचली. त्या वेळी या दोघांमध्ये इतर मित्रांप्रमाणे भरपूर संवाद झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, घरातून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा जया रेखाला काहीतरी बोलली, जे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
जया बच्चन यांनी रेखाला घराबाहेर पडताच सांगितले की, ‘काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही.’ इथूनच रेखाने अमिताभची कंपनी मिळवण्याचे स्वप्न कायमचे सोडले. यानंतर जया आणि अमिताभ बच्चन यांचे वैवाहिक जीवन पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले, परंतु असे असूनही जया बच्चन यांना बिग बींची रोमँटिक शैली कधीच पाहायला मिळाली नाही. याचा खुलासा खुद्द जया बच्चन यांनी केला आहे.