बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं. अक्षय कुमार, सलमान खान, कंगना राणौत, अभिषेक बच्चन, भाग्यश्री यांच्यासह बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी ‘ऊंचाई’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. पण यावेळी जया बच्चन आणि कंगना रणौत यांच्यात असं काही घडलं की याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी रात्री मुंबईमध्ये ‘ऊंचाई’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग झालं. या स्क्रिनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर स्क्रिनिंगसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करताना दिसले. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चनही या स्पेशल स्क्रिनिंगसाठी उपस्थित होत्या. तर दुसरीकडे कंगना रणौतही या स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती. योगायोगाने दोघी अचानक एकमेकींच्या समोर आल्या. दोघांना पाहून फोटोग्राफर्सनी ओरडायला सुरुवात केली. पण जया बच्चन यांनी कंगनाला पाहिल्यावर असं काही केलं की त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा-“रोमँटिक झाल्यानंतर जया…” खासगी आयुष्याबद्दल नॅशनल टेलिव्हिजनवर अमिताभ बच्चन यांचा खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये समोर आलेल्या कंगना रणौत पाहून जया बच्चन यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि अभिनेत्री भाग्यश्रीची गळाभेट घेतली. जया बच्चन आणि कंगना रणौत यांच्यातील हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. एकमेकांच्या समोर असूनही जया बच्चन तिच्याकडे दुर्लक्ष करून इतरांशी बोलताना आणि भेटताना दिसल्या. त्यानंतर कंगनाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. पण याच्या विरुद्ध अभिषेक बच्चनने कंगनाशी केलेल्या वर्तनाने मात्र सर्वाचं लक्ष वेधलं.

आणखी वाचा-अमिताभ बच्चन यांनाही सतावतेय चित्रपट फ्लॉप होण्याची भीती; म्हणाले “हात जोडून विनंती आहे…”

कंगना राणौत आणि जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर युजर्सनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी, ‘कंगना राणौतला वाटलं असावं की जया बच्चन इथेही आल्या आहेत’, तर काहींनी, ‘जया बच्चन कंगनाला घाबरतात.’ अशा कमेंट्स केल्या आहेत. पण त्याचबरोबर, ‘ऊंचाई’ च्या स्क्रीनिंगवेळचा आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि कंगना रणौत एकमेकांना भेटताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांची गळाभेट घेऊन हसत हसत गप्पा मारताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya bachchan ignore kanagana ranaut at uuchai screening video viral mrj