अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) व रेखा(Rekha) यांच्या लव्हस्टोरीबद्दल आजही बोलले जाते. जया बच्चन, अमिताभ बच्चन व रेखा यांच्याबद्दल अनेक चर्चा होत असत. आजही या सेलिब्रिटींच्या नात्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असलेली दिसते. आता लोकप्रिय लेखक हनीफ झावेरी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची लव्हस्टोरी कधी सुरू झाली, तसेच रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल जी चर्चा व्हायची याबद्दल खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चनला चित्रपटात घ्या, मी त्याच्याबरोबर…
हनीफ झावेरी यांनी नुकतीच ‘मेरी सहेली’ या पॉडकास्टला दिली. या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगत म्हटले, “हृषिकेश मुखर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी साईन केले होते. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत जया भादुरी म्हणजेच जया बच्चन होत्य. मात्र, काही काळाने अमिताभ बच्चन यांना त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले, कारण त्यांचे आधीचे काही चित्रपट फ्लॉप झाले होते. ही जया भादुरी व अमिताभ बच्चन यांची पहिली भेट होती. त्यानंतर ‘एक नजर’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले, त्यावेळी जया भादुरी अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या. अमिताभ बच्चन यांची यशस्वी अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू होण्यात जया भादुरी मोठा वाटा होता. कोणतीही आघाडीची अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘जंजीर’ या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हती. पण, जयाने आग्रह केला की अमिताभ बच्चनला चित्रपटात घ्या, मी त्याच्याबरोबर काम करेन. जयाचा हा निर्णय योग्य ठरला आणि ‘जंजीर’ चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला.”
अमिताभ बच्चन-जया-रेखा या त्रिकुटाबद्दल चर्चा सुरू होण्याआधी जया व रेखा यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. इतकेच नाही तर जया बच्चनने रेखाला ‘दुनिया का मेला’ या चित्रपटात काम करण्यासाठी मनधरणी केली होती. या चित्रपटात आधी संजय खान काम करणार होते, मात्र काही गोष्टींमुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांची जागा घेतली.
१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा चित्रपट अभिताभ बच्चन यांच्या खऱ्या आयुष्यावर ऱेखा व जया यांच्याबरोबर असलेल्या नात्यापासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. पण, हनिफ झवेरी यांनी सांगितले की सत्य वेगळेच आहे. यश चोप्रा यांना स्क्रीनवर हा लव्ह ट्रँगल दाखवायचा होता. मात्र, जया बच्चनला ‘सिलसिला’मध्ये कामच करायचे नव्हते, कारण ती रेखाचा तिरस्कार करायची. तिला रेखा आवडायची नाही. या चित्रपटात काम करायचे नाही, असे जयाने ठरवले होते. मात्र, संजीव कुमार ज्यांना जया राखी बंधू मानत असे, त्यांनी तिला या चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले, तिची समजूत घातली. ती या चित्रपटात काम करायला तयार झाली, मात्र तिने एक अट घातली की चित्रपटाचे शूटिंग होईपर्यंत ती रोज सेटवर हजर राहील. तिच्या सीनचे शूटिंग असेल किंवा नसेल तरी ती रोज हजर राहील.”
दरम्यान, ‘सिलसिला’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले नाही. मात्र, हा उत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. विशेष म्हणजे गीतकार म्हणून जावेद अख्तर यांचा हा पहिलाच चित्रपट मानला जातो.