ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन ही बॉलीवूडमधील सदाबहार जोडी म्हणून ओळखली जोते. अमिताभ व जया यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत प्रेक्षक पसंतीही मिळवली होती. तर अमिताभ बच्चन हे आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय असून चित्रपट व टेलीव्हिजनवरील ‘कोण बनेगा करोडपती’ या शोच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. तर जया बच्चन देेखील चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात.
अमिताभ बच्चन व जया बच्चन यांना श्वेता व अभिषक बच्चन अशी दोन मुलं असून त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांची मोठी मुलगी श्वेता बच्चन मात्र या सगळ्यापासून लांब असलेली पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो की आई-वडील इतके मोठे कलाकार असतानाही श्वेता बच्चनने अभिनेत्री होण्याचा निर्णय का नाही घेतला?. एकदा एका चाहत्याने जया बच्चन यांना ‘श्वेता बच्चन यांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं का? की त्यांना प्रोत्साहनन दिलं गेलं नाही?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की, “तिला या क्षेत्रात कधीच रस नव्हता. ती घरी खूप सक्रिय असते. पण बाहेर तिच्या वडिलांसारखी एकदम शांत असते. मला आवडलं असतं जर तिने हे क्षेत्र निवडलं असतं तर आणि मी तिला त्यासाठी प्रोत्साहनही दिलं असतं.”
श्वेता बच्चनला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. म्हणून ती कायम या क्षेत्रापासून आणि प्रसिद्धीपासून लांब असलेलीच पाहायला मिळाली. पण श्वेताने जरी अभिनय क्षेत्रापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला असला तरी तिचा भाऊ अभिषेक बच्चनने मात्र या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि पुढे विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे अनेकांना श्वेता बच्चन अभिनेत्री होऊ शकत असतानाही तिने हे क्षेत्र का निवडलं नसावं? असा प्रश्न पडतो. याबाबत बोलताना श्वेताने एकदा सांगितलं होतं की, “लहान असताना शाळेतील वार्षिक संमेलनात मी भाग घेतला होता. तेव्हा सादरीकरण करताना माझा ड्रेस फाटला आणि इतर मुलींसारखं मला डान्स करता आला नाही. त्यामुळे मला रडू आलं आणि त्यानंतर मी कधी अभिनय करण्याचा प्रयत्नच केला नाही.”
दरम्यान, श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तो २०२४ साली आलेल्या झोया अखतरच्या ‘द अर्चिज’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. तर अगस्त्य लवकरच ‘इक्कीस’ या त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.