ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतात. त्या सातत्याने चिडचिड करताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना अनेकदा फटकारताना दिसतात. पहिल्यांदाच जया बच्चन यांनी त्यांच्या या रागामागचं कारण सांगितलं आहे.
शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोघांची घुसखोरी, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ
“जेव्हा इव्हेंट असतो आणि तुम्ही सगळे असे व्यवस्थित उभे राहून फोटो काढता, तेव्हा मी फोटो काढू देण्यास तयार असते. पण जेव्हा आमचं काहीतरी पर्सनल काम असतं आणि तेव्हा तुम्ही लपून छपून फोटो काढता ते मला आवडत नाही,” असं जया बच्चन यावेळी म्हणाल्या. त्या बोलल्यानंतर फोटोग्राफर्स आपसात एकमेकांना शूटिंग थांबवण्यास सांगतात. तेव्हा जया त्यांना तुम्ही फोटो आणि व्हिडीओ काढू शकता असं म्हणाल्या.
जया बच्चन अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आयोजित केलेल्या पार्टीत पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांचं वेगळंच रुप पाहायला मिळालं. कायम संताप करणाऱ्या जया बच्चन हसत फोटोग्राफर्सना पोज देत होत्या. ‘पाहा किती स्माइल करतेय मी’ असंही त्या म्हणाल्या. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, यापूर्वी अनेकदा त्या फोटोग्राफर्सवर भडकताना दिसतात. त्या त्यांना कॅमेरे बंद करायलाही सांगतात. पण, यावेळी मात्र त्या हसून पोज देताना दिसल्या.