Jaya Amitabh Bachchan Wedding: मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न खूप चर्चेत राहिले. या शाही लग्नाप्रमाणेच सेलिब्रिटींची लग्नही थाटामाटात होतात. पण बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया भादुरी यांचे लग्न अत्यंत साधेपणाने झाले होते. त्यांच्या लग्नातील प्रत्येक सोहळे साधेपणाने झाले होते. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांचे वडील व महान कवी हरिवंशराय बच्चन यांनी खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इन द आफ्टरनून ऑफ टाइम’ या आत्मचरित्रात प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ व जया यांच्या लग्नाबद्दल लिहिलं आहे. तसेच लग्नातील सर्व विधी इतक्या साध्या पद्धतीने का केले होते, याचे कारणही सांगितले आहे. त्यावेळी अमिताभ बच्चन ‘नमक हराम’, ‘सौदागर’ आणि ‘जंजीर’ सारखे चित्रपट करून मोठे स्टार बनले होते आणि त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त होती. लग्नात चाहत्यांची गर्दी होऊ नये म्हणून फक्त मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

“जयाच्या कुटुंबियांनी लग्नाचा कार्यक्रम बीच हाऊसमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये न ठेवता मलबार हिल्समधील स्कायलार्क बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका मित्राच्या घरी आयोजित करायचं ठरवलं,” असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे. अमिताभ यांच्या शेजाऱ्यांनाही या लग्नाची माहिती नव्हती. बच्चन कुटुंबाने फक्त काही लोकांना लग्नासाठी निमंत्रित केलं होतं, त्या मोजक्या पाहुण्यांच्या यादीत जगदीश राजन व त्यांचे कुटुंबीय आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांचे कुटुंब होते. मात्र, इंदिरा गांधी या लग्नाला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यानुळे त्यांनी संजय गांधी यांना अमिताभ-जया यांच्या लग्नाला पाठवलं होतं.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

बंगाली पद्धतीने लग्न व्हावं, अशी जया बच्चन यांच्या पालकांची होती इच्छा

हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात पुढे लिहिलं, “जयाच्या आई-वडिलांना बंगाली पद्धतीने लग्न व्हावं असं वाटत होतं, ज्यावर आमचा कोणताही आक्षेप नव्हता. सर्वात आधी वर-पूजा होती, ज्यात वराचा सन्मान केला जातो, त्यासाठी जयाचे वडील आमच्या घरी भेटवस्तू घेऊन आले आणि एक छोटासा विधी पार पडला.” यानंतर बच्चन कुटुंबीय हा विधी करण्यासाठी बीच हाऊसमध्येही गेले होते, परंतु तिथे वधूशिवाय इतर कोणीही आनंदी दिसत नव्हतं.

अमिताभ बच्चन व जया भादुरी यांच्या लग्नातील काही क्षण

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

हळदी समारंभानंतर बच्चन कुटुंबीय वरात घेऊन स्कायलार्क बिल्डिंगमध्ये गेले, तिथे अगदी साधेपणाने त्यांचे स्वागत करण्यात आले. “आम्ही लिफ्टने वर गेलो, तिथे जया तिच्या नववधूच्या पोशाखात होती आणि मला पहिल्यांदाच ती लाजताना दिसली, तेव्हा मला जाणवलं की हा सौंदर्याचा एक खास पैलू आहे,” असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

वरातीत ३ गाड्या अन् ५ पाहुणे! ५१ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे अमिताभ बच्चन व जया बच्चन, त्यांच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?

पाहुणे घरी परतले अन्…

वरातीत गेलेले लोक रात्रीच्या जेवणानंतर परतले आणि कुटुंबातील सगळे तिथेच थांबले. “आम्ही तिथून निघण्यासापूर्वी मी माझ्या नवीन सूनेच्या वडिलांचे अमितसारखा जावई मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. मला वाटलं होतं की तेही जयासाठीही असंच काहीतरी बोलतील, पण ते म्हणाले ‘माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे’,” असं हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलं आहे.

अमिताभ बच्चन आणि जया यांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. त्यांचे लग्न ३ जून १९७३ रोजी झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya bhaduri father said my family is ruined after daughter married to amitabh bachchan hrc