चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. जितेंद्र आणि शोभा कपूर यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी शुभेच्छा दिल्या. या दोघांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनमध्ये जितेंद्र यांनी डान्स केला. तर, त्यांची मुलगी एकता कपूर तिच्या गर्ल गँगबरोबर थिरकताना दिसली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील जुहू भागातील जितेंद्र यांच्या कृष्णा बंगल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोनाली बेंद्रे, अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरी, डेव्हिड धवन आणि इतर स्टार्स या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा – ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार

जितेंद्र व शोभा कपूर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. नीलम कोठारी, क्रिस्टल डिसूझा, राकेश रोशन, समीर सोनी आणि रिद्धी डोगरा यांनही हजेरी लावली होती. सेलिब्रेशनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुपरस्टार जितेंद्र राकेश रोशन यांच्याबरोबर त्यांच्या १९८३ साली आलेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटातील ‘नैनों में सपना’ या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – बिग बॉसमध्ये भेट अन् ३ वर्षांनी ब्रेकअप, एजाज खानने धर्मांतरासाठी एक्स गर्लफ्रेंडवर दबाव टाकण्याच्या आरोपांवर दिलं उत्तर

मुश्ताक खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राकेश रोशन व जितेंद्र डान्स करताना दिसतात.

पाहा व्हिडीओ –

एकता कपूर गर्ल गँगबरोबर थिरकली

सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये एकता कपूर, रिद्धी डोगरा आणि इतर ‘द डर्टी पिक्चर’मधील ‘ऊ लाला’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. एकता कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रिद्धी डोगरा, महीप कपूर, नीलम कोठारी आणि इतर मुली डान्स करताना दिसत आहेत. यावेळी अभिनेता जितेंद्र आणि त्यांची पत्नी शोभा एकमेकांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालताना दिसले.

हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

जितेंद्र आणि शोभा कपूर यांनी १९७४ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याची मुलगी एकता कपूर हिचा जन्म १९७५ मध्ये झाला होता. तर मुलगा तुषार कपूरचा जन्म १९७६ मध्ये झाला. एकता प्रसिद्ध निर्माती असून तुषार अभिनेता आहे.