‘जीव माझा गुंतला’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर जून २०२१ ते सप्टेंबर २०२३ या काळात प्रसारित केली जायची. या मालिकेमुळे घराघरांत एक नवीन चेहरा लोकप्रिय झाला. या अभिनेत्रीचं नाव आहे योगिता चव्हाण. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत योगिताने ‘अंतरा’ हे पात्र साकारलं होतं. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर योगिता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगिता दमदार अभिनेत्री आहेच याशिवाय ती उत्तम डान्स देखील करते. इन्स्टाग्रामवरील ट्रेडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनवून योगिता नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेते. नुकताच तिने २१ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यामध्ये तिचे एक्स्प्रेशन, कमालीची एनर्जी पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत.

हेही वाचा : शूटिंगवेळी सलमान खानची ‘ती’ कृती अन् अभिनेत्रीने सर्वांसमोर मारलेली थोबाडीत, स्वतःच सांगितला ३० वर्षे जुना किस्सा

२००१ मध्ये ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कुछ ना कहो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटींची कमाई केली होती. सिनेमाला फारसं यश मिळालं नसलं तरीही यामधील सगळी गाणी सुपरहिट ठरली होती. याचं कारण म्हणजे चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी शंकर एहसान लॉय यांनी सांभाळली होती. या चित्रपटामधलं “तुम्हें आज मैंने जो देखा…” हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

हेही वाचा : अंबानींच्या मोठ्या सुनेने २३ वर्षांनी रिक्रिएट केला करीना कपूरचा ‘बोले चुडिया’ लूक! श्लोकाला ‘त्या’ रुपात पाहून बेबो देखील भारावली

ऐश्वर्या – अभिषेकच्या या २१ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर नेटकरी विविध डान्स व्हिडीओ सध्या बनवत आहेत. अशातच या गाण्यावर योगिताने जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : सासूबाई अन् आई एकाच फ्रेममध्ये…; नीतू कपूर यांच्या वाढदिवशी आलिया भट्टने शेअर केला खास फोटो, म्हणाली…

दरम्यान, योगिता चव्हाणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘जीव माझा गुंतला’नंतर योगिता कोणत्याही मालिकेत झळकली नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने पती सौरभबरोबर एका गाण्यात काम केलं होतं. याशिवाय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, यावर्षी मार्च महिन्यात अभिनेत्रीने ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुलेशी विवाह केला. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती.