68th Filmfare Awards 2023 : ६८व्या फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुरूवारी (२७ एप्रिल) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. सलमान खानने या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. तर आयुष्मान खुराना व मनिष पॉल को-होस्ट होते.

यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंसाठी खास ठरला. या पुरस्कार सोहळ्यात नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील अंकुश गेदामला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला. अंकुशने ‘झुंड’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.

हेही वाचा>> 68th Filmfare Awards 2023: आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, वाचा विजेत्यांची यादी

अंकुश गेदामला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत अंकुशचं अभिनंदन केलं आहे. “लव्ह यू भाई” असं म्हणत गौरवने अंकुशसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

ankush-gedam-filmfare-award-2023

हेही वाचा>> Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची हिंदी अभिनेत्रीलाही भुरळ, देवोलिना भट्टाचार्जीचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या दोन चित्रपटांचा जलवा पाहायला मिळाला. राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या फिल्मफेअर पुरस्काराची मानकरी ठरली.

Story img Loader