अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केल्याचं कोर्टाने अंतिम निकाल देताना सांगितलं. कोर्टाच्या या निर्णयानंतर दिवगंत जिया खानची आई राबिया खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोठी बातमी! जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

“कोर्टाने निकाल दिला असला तरी माझा कोर्टाला एकच प्रश्न आहे की माझ्या मुलीचा मृत्यू झाला कसा? तिच्या मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. मी सुरुवातीपासूनच म्हणत आले आहे की, हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं नाही, तर ते हत्येचं आहे. हे खुनाचे प्रकरण आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. पण माझा लढा सुरूच राहील. या निर्णयाला मी उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलीसाठी का नाही लढणार?” असा प्रश्न राबिया खान यांनी उपस्थित केला आहे.

सूरज पांचालोची निर्दोष सुटका झाल्यावर आपल्या मुलीचा जीव नेमका कसा गेला, असा प्रश्न राबिया खान विचारत आहेत. राबिया यांनीच जियाच्या निधनानंतर सूरजवर तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे आरोप केले होते. जियाच्या सुसाईड नोटच्या आधारे त्याच्यावर कारवाईही झाली होती. आता १० वर्षांनी कोर्टाने यावर अंतिम निकाल दिला असून सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.