११ ऑक्टोबरला दोन मोठे बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाले. एक आलिया भट्ट व वेदांग रैना यांचा ‘जिगरा’ आणि दुसरा म्हणजे राजकुमार राव, तृप्ती डिमरी या ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ’. दोन्ही चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी कोणता वरचढ ठरला ते पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकड्यांवरून जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा नुकताच रिलीज झालेला ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ हा एक हलका-फुलका विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच एक चांगला मेसेजही देतो. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरनंतर प्रमोशनच्या पद्धतीनेही लक्ष वेधले होते, त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होती. प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. त्याचा परिणाम म्हणजे पहिल्या दिवशी या सिनेमाने चांगली कमाई केली.
सूर जुळले…! म्हणत कोकण हार्टेड गर्लने अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा, नावही आलं समोर
‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’
Vicky Vidya Ka Woh Wala Video Box Office Collection Day 1: इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी पाच कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट फक्त ३० कोटी रुपये आहे, त्यामुळे सिनेमाची सुरुवात चांगली झाली असं म्हणता येईल. वीकेंडच्या दोन दिवसांत या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”
‘जिगरा’ची पहिल्या दिवसाची कमाई
Jigra Box Office Collection Day 1: ‘जिगरा’ हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. आलिया भट्टने या सिनेमात अनेक ॲक्शन सीनही केले आहेत. ‘जिगरा’चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करेल, असं वाटलं होतं. मात्र सिनेमाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाची कामगिरी निराशाजनक आहे. ‘जिगरा’ला रिलीजच्या पहिल्या दिवशी फारसे प्रेक्षक मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोही रद्द करावे लागले. आता चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
आलिया भट्टच्या लाडक्या लेकीला आवडतं ‘नाटू-नाटू’ गाणं, आईबरोबर ‘अशी’ नाचते, पाहा व्हिडीओ
९० कोटींचे बजेट असलेल्या ‘जिगरा’ने पहिल्या दिवशी ४.५५ कोटी रुपयांची कमाई केली. हा आलियाचा मागील १० वर्षातील सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा होईल आणि त्याची कमाई वाढेल अशी आशा निर्मात्यांना आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या ‘वेट्टैयान’ आणि राजकुमार राव यांच्या ‘विकी विद्या का वो व्हिडिओ’कडून तगडी टक्कर मिळाली आहे. त्यामुळे ‘जिगरा’ची पहिल्या दिवसाची कमाईही कमी झाली आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती व्यवसाय करतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.