काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र आता हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. चित्रपटात पैसे गुंतवणाऱ्या जिओ स्टुडिओने चित्रपटापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतल्याची बातमी समोर येत आहे. याबरोबरच चाहत्यांच्या अत्यंत आवडीचा ‘हेरा फेरी’ सीरिजचा तिसऱ्या भागाची जिओ निर्मिती करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जर चित्रपटाला निर्माता मिळाला नाही तर तो या दोन्ही चित्रपटांना तूर्तास ब्रेक लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘हेरा फेरी ३’ तर पुन्हा डबाबंद होऊ शकतो अशी चर्चा सध्या कानावर पडत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या दोन्ही चित्रपटातून जिओ स्टुडिओज पूर्णपणे बाहेर पडलं आहे.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
shashank shende reacted on marathi industry recent situation
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

‘वेलकम टू द जंगल’च्या घोषणेनंतर जिओ स्टुडिओ आणि फिरोज नाडियादवाला यांच्यात आर्थिक गोष्टींवरुन तणाव निर्माण होऊ लागला होता. फिरोज यांचे काही कर्ज शिल्लक आहे जे त्याने अद्याप फेडलेले नाही अन् अशा काही कायदेशीर समस्यांमुळे जिओ स्टुडिओने ‘वेलकम टू द जंगल’पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय अजूनही या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर परिस्थिती सुधारली तर जिओ पुन्हा यात निर्माता म्हणून सामील होईल परंतु तूर्तास त्यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’ मध्ये बॉबी देओलच्या एंट्रीच्या ‘जमाल कुडू’ गाण्यात दिसणारी ‘ती’ तरुणी आहे तरी कोण? जाणून घ्या

याचाच परिणाम आगामी ‘हेरा फेरी ३’वरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. फिरोज यांच्या काही थकबाकीमुळे जिओने त्या प्रोजेक्टपासूनही वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘वेलकम टू द जंगल’चं एक शेड्यूल पूर्ण झालं आहे अन् दुसरं शेड्यूल २०२४ च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. अक्षय कुमार आणि फिरोज या दोघांना आता या चित्रपटांसाठी एक मोठा, तगडा आणि विश्वासू निर्माता शोधणं भाग आहे. निर्माता न मिळाल्यास हे दोन्ही चित्रपट आणखी लांबणीवर पडू शकतात.

Story img Loader