साऊथचे सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी २०१३ मध्ये सर्वोत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम’ आणला होता. त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार झाला आणि त्यात अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे दोन्ही भाग तुफान हिट झाले. नुकतंच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी बातमी समोर आली होती.
काही मीडिया रीपोर्टया आगामी चित्रपटाची तयारी सुरू झाल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर ‘दृश्यम’ची हिंदी आणि मल्याळम भाषेतील टीम एकाच वेळी दोन्ही चित्रपटांचं शूटिंग करणार असून हे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
आणखी वाचा : २५ रुपये घेऊन मुंबईत आला, आज वर्षाला कमावतोय २५ लाख; कोण आहे सेलिब्रिटी फोटोग्राफर मुन्ना ठाकूर? जाणून घ्या
या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचं जीतू जोसेफ यांनी स्पष्ट केलं आहे. Cue Studio शी संवाद साधताना जीतू जोसेफ म्हणाले, “चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल आलेल्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. अद्याप या दोन्ही प्रोजेक्टबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. इतकंच नव्हे तर आम्ही इतरांकडून आलेल्या ‘दृश्यम ३’च्या स्क्रिप्ट उत्सुकतेने ऐकत आहोत हेदेखील खोटं आहे.”
पुढे जीतू जोसेफ म्हणाले, “मी आधीही याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे जर आम्ही पुढील कथेत काही चांगले बदल करून एक उत्तम कथा तयार करू शकलो तरच आम्ही याच्या पुढील भागावर काम सुरू करू. आम्ही नक्कीच याच्या पुढील भागावर विचारमंथन करत आहोत. अजूनतरी याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.” त्यामुळे ‘दृश्यम ३’साठी प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागणार हे जीतू जोसेफ यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे.