एकेकाळी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम व बिपाशा बासू रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास एक दशक एकमेकांना डेट केल्यावर जॉन व बिपाशाच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण, जॉन एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये प्रियांका चोप्रा आणि अभिषेक बच्चन यांच्यासह गेला होता. यावेळी त्याला करणने एक प्रश्न विचारला होता, त्यावर जॉनने दिलेल्या उत्तराची खूप चर्चा झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

‘जॉन गे असला असतास तर कोणाबरोबर हूक अप केलं असतंस’ व ‘कोणत्या एका स्त्रीसाठी तू बिपाशाची फसवणूक करशील’, असे प्रश्न रॅपिड फायरमध्ये करणने विचारले होते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटचं नाव घेतलं होतं. तर, बिपाशाबद्दलच्या प्रश्नावर ‘फक्त एक?’ असं उत्तर त्याने हसत दिलं होतं. त्यावर हे उत्तर बिपाशासाठी असल्याचं प्रियांका चोप्रा म्हणाली होती.

दरम्यान, नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ एकमेकांना डेट केल्यावर जॉन व बिपाशा विभक्त झाले होते. त्यानंतर जॉनने बँकर प्रिया रुंचालशी लग्नगाठ बांधली. तर, बिपाशाने करण सिंह ग्रोवरशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव देवी आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John abraham reply when karan johar asked one woman you would cheat on bipasha basu for hrc