John Abraham : बॉलीवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करत आहे. याच निमित्ताने जॉनने एक मुलाखत दिली. यात त्याने त्याच्या सर्वोत्तम किसबद्दल सांगितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जॉनला सर्वात बेस्ट किस त्याची पत्नी किंवा कोणत्याही सहकलाकार अभिनेत्रीने केलं नाही; तर त्याने एका सुपरस्टारचं नाव घेतलं.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जॉनने (John Abraham Best Kiss) किसबद्दल खुलासा केला. जॉनने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर मोठ्या पडद्यावर रोमान्स केला आहे. बऱ्याच अभिनेत्रींबरोबर इंटिमेट व किसिंग सीनही केले आहेत. पण जॉनला आतापर्यंतचे ‘बेस्ट किस’ कोणत्याच अभिनेत्रीचं किंवा त्याची पत्नी प्रिया रुंचालने केलं नाही. त्याने कोणाचं नाव घेतलं? ते जाणून घेऊयात.
जॉनने घेतलं शाहरुख खानचं नाव
जॉनने सांगितलं की त्याला आजवरचे सर्वात बेस्ट किस शाहरुख खानने (Shahrukh Khan) केले. जॉन अब्राहमने शाहरुख खानबरोबर ‘पठाण’ चित्रपटात काम केलं होतं. दोघांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी एक मोठी सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली होती. या पार्टीत शाहरुखने जॉनला किस केलं होतं. हा फोटो जॉनला त्याच्या मुलाखतीत दाखवण्यात आला, तो पाहिल्यावर त्याने केलेलं विधान चर्चेत आहे.
बिपाशा बसू आणि प्रियांका चोप्रा सारख्या अभिनेत्रींबरोबर किसिंग सीन करणारा जॉन अब्राहम म्हणाला, “हे माझ्या आयुष्यातील बेस्ट किस आहे, जे मला शाहरुख खानने केले, कोणत्याही महिलेने नाही. हा फोटो पठाणच्या सक्सेस पार्टीतला आहे.” शाहरुख खान एक अतिशय सुंदर व्यक्ती आहे, तो खूप चांगला आहे, असंही जॉनने म्हटलं.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते. यात जॉनने नकारात्मक भूमिका केली होती. ‘पठाण’ने अवघ्या सात दिवसांत जगभरात तब्बल ६३४ कोटी रुपयांची कमाई केली होती.