‘पठाण’ व ‘वेदा’नंतर अभिनेता जॉन अब्राहम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘द डिप्लोमॅट’चा टीझर रिलीज झाला आहे. जवळपास एक मिनिटाच्या टीझरची सुरुवात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका क्लिपने होते, ज्यात ते म्हणतात की जगातील सर्वात मोठे डिप्लोमॅट एक श्रीकृष्ण आणि एक हनुमानजी होते. यानंतर पडद्यावर जॉन अब्राहमची एंट्री होते. या चित्रपटात जॉन मुख्य भूमिकेत आहे, त्याने जेपी सिंह यांची भूमिका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या टीझरमध्ये एक महिला बुरखा घालून स्वत:ला भारतीय नागरिक म्हणताना दिसत आहे. नंतर पुढच्याच क्षणी जॉन अब्राहम तिची चौकशी करताना दिसतो. जॉन तिला खरं बोलायला सांगतो. त्यानंतर जॉनच्या मागावर आयएसआयचे लोक असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यावर तो म्हणतो, “ये पाकिस्तान है बेटा, आदमी हो या घोड़ा, सीधा नहीं चलता है, हमेशा ढाई कदम.”

पाहा टीझर

शिवम नायर दिग्दर्शित हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘द डिप्लोमॅट’ची कथा, पटकथा आणि संवाद रितेश शाहने लिहिले आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी डिमो पोपोव्हने केली आहे. चित्रपटाचे संगीतकार ए.आर. रहमान आहेत. गाणी मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहेत. यामध्ये रेवती, कुमुद मिश्रा आणि शरीब हाश्मी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

जॉन अब्राहमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास याआधी तो ‘वेदा’मध्ये दिसला होता. या चित्रपटात शर्वरी वाघदेखील मुख्य भूमिकेत होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप ठरला होता. त्यामुळे आता जॉनला ‘द डिप्लोमॅट’ या आगामी चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे, ते पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप तयारी केली आहे, असं दिसतंय. आता या चित्रपटाला रिलीजनंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.