उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला. अंबानींच्या मुंबईतील अँटेलिया निवासस्थानी अगदी राजेशाही थाटात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी अनेकजण थ्री-पीस सूट, लेहंगा, साडी यासारख्या वेशात पोहोचले होते. मात्र यावेळी अभिनेता जॉन अब्राहमने परिधान केलेल्या कपड्यामुळे तो ट्रोल झाला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन, दीपिका, रणवीर, सलमान खान, शाहरुख खान, जॉन अब्राहम यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकार यावेळी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जॉन अब्राहमने कॅज्युअल लूक केला होता. यावेळी त्याने काळ्या रंगाचा जॅकेट, पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती. त्याबरोबर त्याने स्निकर्स घातले होते.
आणखी वाचा : …म्हणून आलिया, करीना आणि सैफ अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुडा सोहळ्याला राहिले गैरहजर?
जॉन अब्राहमने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तो ट्रोल झाला आहे. यावरुन नेटकरी ट्रोल करताना दिसत आहे. यावेळी एक नेटकरी म्हणाला, “नशिब शूज तरी परिधान केला आहे.” तर एकाने यापेक्षा चांगले कपडे परिधान करायला हवे होते”, असे म्हटले आहे. “हा माझ्या भावासारखा आहे, कुठेही जिन्स परिधान करुन जातो”, असे नेटकऱ्याने म्हटले. याला थेट कार्टर रोडवरुनच बोलवलं का? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे.
आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात दीपिका पदुकोणचा शाही थाट, साडीची किंमत माहीत आहे का?
दरम्यान जॉन अब्राहम लवकरच ‘पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.