Vedaa Vs Khel Khel Mein box office collection : तीन मोठे बॉलीवूड चित्रपट गुरुवारी (१५ ऑगस्ट रोजी) प्रदर्शित झाले. यामध्ये श्रद्धा कपूर व राजकुमार रावचा ‘स्त्री २’, अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर यांचा ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहम-शर्वरी यांच्या ‘वेदा’ या तीन चित्रपटांचा समावेश आहे. या तिन्हीपैकी पहिल्या दिवशी ‘स्त्री २’ने बाजी मारली. पण ‘वेदा’ व ‘खेल खेल में’ पैकी कोणता चित्रपट वरचढ ठरला ते जाणून घेऊयात.
‘वेदा’ चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई
Vedaa box office collection day 1: इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘वेदा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी देशभरात ६.५२ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने हिंदी भाषेत ६.५ कोटी रुपये कमावले. तर तमिळ व तेलुगू भाषेत या चित्रपटाने प्रत्येकी ५० लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले आहे. वेदा चित्रपटाचे बजेट ६० कोटी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. महत्वाचं म्हणजे जॉनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ पेक्षा चांगली ओपनिंग केली आहे.
‘खेल खेल में’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
Khel Khel Mein box office collection day 1: अक्षय कुमार, फरदीन खान, तापसी पन्नू आणि वाणी कपूर यांच्या भूमिका असलेला, ‘खेल खेल में’ हा कॉमेडी चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. मुद्दसर अझीझ दिग्दर्शित या चित्रपटाला ‘वेदा’ व ‘स्त्री २’ कडून चांगलीच टक्कर मिळाली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार या तिन्ही चित्रपटांपैकी ‘खेल खेल में’ची कमाई सर्वात कमी राहिली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५ कोटी रुपये कमावले. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या
‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी
Stree 2 Box Office Collection day 1: या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी ५४.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘स्त्री २’ चे बुधवारी काही खास ओपनिंग प्रीमियर होते, त्यातून चित्रपटाने ८.३५ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने अंदाजे ४६ कोटी कमावले. अशारितीने चित्रपटाची एकूण कमाई ५४.३५ कोटी झाली आहे. ‘स्त्री २’ने ‘कल्की 2898 एडी’ (हिंदी- २४ कोटी) आणि ‘फायटर’ला (२२ कोटी) मागे टाकलं असून तो २०२४ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.