John Abraham : गेल्या वर्षी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. शाहरुखसह दीपिका पादुकोण, आशुतोष राणा, डिंपल कपाडिया असे मातब्बर कलाकार या चित्रपटात पाहायला मिळाले. मात्र यासगळ्याबरोबरच जॉन अब्राहमनं साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्षं वेधून घेतलं. याच चित्रपटाच्या संबंधित एक किस्सा जॉनने नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता जॉन अब्राहमचा ‘वेदा’ चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच तो आणि ‘वेदा’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल अडवाणी सोनी टिव्ही वरील ‘आपका अपना झाकीर’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी जॉननं ‘पठाण’ (Pathan) च्या सक्सेस पार्टीमध्ये घडलेला किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला. (Pathan) चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला जाण्यासाठी जॉनने नकार दिला होता, मात्र त्यावेळी शाहरुखने नेमकं असं काय केलं की, जॉन पुरताच भारावून गेला होता, याबद्दल अभिनेत्याने झाकिरच्या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

हेही वाचा – आयुष्मान खुरानानंतर सनी देओलच्या Border 2 चित्रपटात बॉलीवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोची वर्णी, झळकणार प्रमुख भूमिकेत

john abraham and shahrukh khan

पार्टीत शाहरुखनं दिलं जॉनला महागडं गिफ्ट

‘पठाण’मध्ये शाहरुख खानबरोबरच जॉननं ( John Abraham ) साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. जॉन म्हणाला की, ‘पठाण’ (Pathan) हिट झाल्यानंतर सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीदरम्यान मी शाहरुखला गमतीत म्हटलं होतं, “मला एक गिफ्ट हवं आहे.”‘पठाण’ (Pathan) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळायला लागलं होतं. म्हणून चित्रपटातील कलाकारांसाठी पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी शाहरुख आणि जॉन ( John Abraham ) दोघंही या पार्टीला हजर होते. त्यावेळी शाहरुख जॉनला म्हणाला, “कम ऑन जॉन, मस्त पार्टी एन्जॉय कर. सगळीकडे आपल्याच चित्रपटाची चर्चा आहे.” तेव्हा मी शाहरुखला म्हणालो की, मला पार्टीला यावंसं वाटत नव्हतं. आता खूप थकलोय मला घरी राहून झोपावंसं वाटतंय, तेव्हा शाहरुखनं मला अचानक विचारलं की, काय हवंय तुला? तेव्हा मी म्हटलं की, मला बाईक हवी आहे. तेव्हा शाहरुखनंही कसलाही विचार न करता, मला बाईक गिफ्ट दिली.

हेही वाचा – “माझे बाबा संतापले आणि त्यांनी मला थेट घरीच बोलावून घेतलं”, कंगना रणौत यांनी ‘मर्डर’ चित्रपटासंबंधित सांगितला ‘तो’ किस्सा

बाईक बघूनच मी खूप खुश झालो आणि घरी गेलो, असं जॉनने सांगितलं. पुढे अभिनेता असंही म्हणतो की, मला अजूनही आठवतंय की, ‘पठाण’च्या पार्टीला शाहरुख खूपच आनंदी होता. चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत, याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शाहरुख खान एक उत्तम अभिनेता तर आहेच; पण त्याचबरोबर तो चांगला माणूसही आहे. सेटवर असताना तो प्रत्येक भूमिकेचा खूप बारकाईनं आणि हुशारीनं अभ्यास करतो तसाच तो त्याच्या सहकलाकाराची काळजी देखील घेतो. ‘पठाण’च्या निमित्तानं मला शाहरुखबरोबर खूप वेळ राहता आलं आणि या माझ्या आयुष्यातल्या सर्वांत सुंदर आठवणी आहेत. हा किस्सा झाकिरच्या शोमध्ये आणि एका यूट्यूब पॉडकास्टवर जॉननं ( John Abraham ) सांगितला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John abrahamtold about shahrukh khan gifted him bike on pathan sucsess party share memories on apka apna zakir show tsg