१९९३ साली ‘बाजीगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. ‘बाजीगर’मधील शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवीन असलेल्या शाहरुखसाठी ही भूमिका साकारणे एक मोठे आव्हान होते. परंतु ही नकारात्मक भूमिका साकारत तो एक चतुरस्त्र अभिनेता आहे हे त्याने सगळ्यांसमोर सिद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटात शाहरुखच्या कामाचं तर कौतुक झालंच, पण याबरोबरच इतरही कलाकार भाव खाऊन गेले. काजोलचं काम लोकांनी डोक्यावर घेतलं, या चित्रपटातून शिल्पा शेट्टीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यांच्याबरोबरच या गंभीर चित्रपटात आपल्या छोट्या मोठ्या सीन्समधून प्रेक्षकांना हसवायचा प्रयत्न जॉनी लिवर यांनी केला. आजही ‘बाजीगर’ची आठवण आली की शाहरुखच्या बरोबरीनेच आपल्या डोळ्यासमोर जॉनी लिवर यांचाही चेहेरा उभा राहतो.

आणखी वाचा : Joker 2: जोकर आणि हारले क्वीनचा हटके आणि रोमॅंटिक अंदाज; दिग्दर्शकाने शेअर केला चित्रपटाचा नवा लूक

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान जॉनी लिवर यांनी ‘बाजीगर’दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी जॉनी लिवर यांची लोकप्रियता ही शाहरुखपेक्षा जास्त होती असा दावाच जॉनी यांनी केला आहे. यूट्यूबवरील ‘टीआरएस’ या पॉडकास्ट शोमध्ये नुकतीच जॉनी लिवर यांनी हजेरी लावली. यावेळी जॉनी लिवर म्हणाले, “१९९१ साली आम्ही सर्वप्रथम ‘बाजीगर’साठी एकत्र काम करायला सुरुवात केली. त्यावेळी शाहरुखने ‘राजू बन गया जेंटलमॅन’ आणि इतर काही चित्रपट केले होते, पण त्यावेळी शाहरुखपेक्षा मी अधिक लोकप्रिय होतो. तेव्हा सेटवरदेखील त्याच्यापेक्षा जास्त मला ओळखणारे लोक असायचे. मी तेव्हा एक स्टार होतो अन् शाहरुख नुकताच आला होता.”

पुढे जॉनी म्हणाले, “त्यावेळी शाहरुख फाईट सिक्वेन्समध्ये तसेच डान्समध्येही बराच कच्चा होता. आज तो इतकी उत्तम फाईट आणि डान्स करतोय ते केवळ त्याने त्याच्या उमेदीच्या काळात घेतलेल्या मेहनतीमुळे. मी आजवर त्याच्याइतकी मेहनत घेणाऱ्या अभिनेत्याला पाहिलेलं नाही. बरीच पुरुष मंडळी तेव्हा शाहरुखवर खार खाऊन असायची कारण त्यांच्या जोडीदाराला शाहरुख प्रचंड आवडायचा, पण शाहरुख मात्र त्याच्या कामाशी एकनिष्ठ होता.” ‘बाजीगर’नंतरही जॉनी लिवर यांनी शाहरुखच्या ‘करण अर्जुन’, ‘बादशाह’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’सारख्या चित्रपटातही छोटी भूमिका निभावली.