बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही मधले बरेच दिवस चित्रपटसृष्टीपासून लांब होती. पण तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चर्चेत असायची. शाहरुखबरोबर विकत घेतलेली आयपीएल टीम असो किंवा इतर काही वादग्रस्त गोष्टी, जुही कायम चर्चेत असायची. याबरोबरच पर्यावरणाबाबतही जुही चांगलीच जागरूक असते, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तिच्याकडून जे होईल ते ती करत असते. मध्यंतरी ५जी टेस्टिंगविरुद्ध बोलल्यानंतर तिची कोर्ट केस चांगलीच चर्चेत आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतासुद्धा जुही अशाच एका वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चे आली आहे. दक्षिण मुंबईतील काही भागातील प्रदूषित हवेबद्दल जुहीने ट्विटरवर तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. जुहीने मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणते, “हवेत पसरलेली दुर्गंधी कुणाच्या लक्षात आली आहे का? याआधी अशी दुर्गंधी बांद्रा, वरळीजवळील भागातील खाडीच्या इथून जाताना जाणवायची. आता मात्र ही दुर्गंधी पूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे. या दुर्गंधीमुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे दिवसेंदिवस आम्हाला गटारात राहत असल्यासारखं वाटत आहे.”

आणखी वाचा : रक्ताने माखलेले हात आणि रहस्यमय हावभाव; कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’मधील फर्स्ट लूक व्हायरल

जुहीच्या या ट्वीटवर काही लोकांनी तिला ट्रोल केलं तर काहींनी इतर शहरातील प्रदूषणाचे दाखले दिले तर काही लोकांनी जुहीच्या म्हणण्याला दुजोरा दिला. जुही पर्यावरणावर खूप प्रेम करते. ती घरातील लोकांच्या वाढदिवशी वृक्षारोपणदेखील करते. ५जीच्या टेस्टिंगदरम्यानही जुहीने आवाज उठवला होता.

जुही नुकतीच परेश रावल आणि ऋषि कपूर यांच्याबरोबर ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटातून झळकली. शिवाय नुकत्याच प्राइम व्हिडिओच्या ‘हश हश’ या वेबसीरिजमधून जुहीने ओटीटीविश्वात पदार्पण केलं. या सीरिजमध्ये जुहीच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. जुहीने उद्योगपती जय मेहता यांच्याबरोबर लग्न केलं आहे. शिवाय शाहरुखबरोबर ती कलकत्ताच्या क्रिकेट टीमची मालकीण आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhi chawala talks about stench in south mumbai says she feels like living in sewer avn